Nokia 110 4G आणि Nokia 105 4G लॉन्च, शानदार फिचर्ससह किंमती बद्दल जाणून घ्या अधिक
नोकिया स्मार्टफोन (Photo Credits-Twitter)

HMD Global कडून आपले दोन नवे धमाकेदार स्मार्टफोन Nokia 110 4G आणि Nokia 105 4G युरोपात लॉन्च केले आहेत. दोन्ही फिचर फोन काही रंगात उपलब्ध आहेत. दोन्ही फिचर फोनमध्ये Unisoc T107 चिपसेट, 128MB रॅम आणि 48MB चा इंटरनल स्टोरेज दिला आहे. या व्यतिरिक्त दोन्ही डिवाइसमध्ये दमदार बॅटरी सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. 2019 मध्ये नोकिया 110 आणि नोकिया 105 हा 5G कनेक्टिव्हिटीसह ग्लोबल बाजारात उतरवण्यात आला होता.(Tecno Spark 7T भारतात लॉन्च; Amazon India वर 'या' तारखेपासून सुरु होणार ऑनलाईन सेल)

नोकिया 110 4जी आणि नोकिया 105 4जी मध्ये 1.8 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 120X160 पिक्सल आहे. दोन्ही डिवाइस KaiOS ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. त्याचसोबत दोन्ही रीड-आउट असिस्टेंट फिचर सपोर्ट मिळणार आहे. या फिचरची खासियत अशी की तो मेसेज वाचून दाखवतो. या व्यतिरिक्त फोनमध्ये वॉइस ओव्हर LET चा सपोर्ट मिळणार आहे.

या फोनसाठी 1020mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, या दोन्ही फोनची बॅटरी स्टँडबाय टाइम मध्ये 18 तास आणि 4जी टॉक टाइममध्ये 5 तासांचा बॅकअप देते,(MiVi चे शानदार MiVi Play ब्लूटूथ स्पीकर भारतात लॉन्च, किंमत 800 रुपयांहून कमी)

Nokia 110 4G फिचर फोनमध्ये कॅमेरा दिला जाणार असून Nokia 105 4G मध्ये कॅमेरा देण्यात आलेला नाही. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही फोनमध्ये FM रेडियो, 3.5mm हेडफोन जॅक, LED फ्लॅश लाइट आणि मायक्रो-कार्ड स्लॉट दिला आहे. कंपनीने नोकिया 110 4जी फिचर फोनची किंमत 39.90 युरो (3600 रुपये) आणि नोकिया 105 4जी फिचर फोनची किंमत 34 युरो (3,100 रुपये) ठेवली आहे.