Tecno Spark 7T भारतात लॉन्च; Amazon India वर 'या' तारखेपासून सुरु होणार ऑनलाईन सेल
Tecno Spark 7T (Photo Credits: Tecno Mobile India)

टेकनो मोबाईल इंडियाने (Tecno India) स्पॉर्क 7 सिरीज (Spark 7 Series) मधील नवे अॅडिशन लॉन्च केले आहे. टेकनो स्पार्क 7 टी (Tecno Spark 7T) हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला असून 15 जून रोजी याचा पहिला ऑनलाईन सेल (First Online Sale) असेल. अॅमेझॉन इंडिया (Amazon India) वर 15 जून रोजी दुपारी 12 वाजता पहिला ऑनलाईन सेल सुरु होईल. या सेलमध्ये 1000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येईल. या स्मार्टफोनचा 4जीबी+64जीबी वेरिएंट 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Blue, Magnet आणि Nebula Orange या तीन रंगात उपलब्ध आहे.

Tecno Spark 7T या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा फुल एचडी+डॉट डिस्प्ले 1600x720  पिक्सल रिजोल्यूशनसह दिला आहे. यात MediaTek Helio G35 SoC प्रोसेसर 4जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज सह दिला आहे. (नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी 'या' स्पेसिफिकेशनवर जरुर लक्ष द्या अन्यथा फसवणूकीला बळी पडाल)

Tecno Mobile Ind Tweet:

Tecno Spark 7T (Photo Credits: Tecno Mobile India)

फोटोग्राफीसाठी या मोबाईलमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून 48MP चा मेन कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP शूटर दिला आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात GPS, Bluetooth v5, OTG support, Wi-Fi, 4G, आणि फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात 6,000mAh ची बॅटरी दिली असून हा फोन अॅनरॉईड 11 OS आपरेटींग सिस्टमवर काम करतो.