MiVi चे शानदार MiVi Play ब्लूटूथ स्पीकर भारतात लॉन्च, किंमत 800 रुपयांहून कमी
MiVi Play Bluetooth Speaker (Photo Credits-Twitter)

ऑडिओ ब्रँन्ड MiVi यांनी आपले शानदार ब्लूटूथ स्पीकर MiVi Play भारतात लॉन्च केले आहे. हा वायरलेस स्पीकर सहा कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. या स्पीकरची साइज कॉम्पॅक्ट असल्याने तो सहज कुठेही आपल्यासोबत घेऊन जाता येणार आहे. या व्यतिरिक्त मिवी प्ले स्पीकर मध्ये डीप बाससह 52mm चे ड्रायव्हर दिले असून जे शानदार साउंड प्रोड्युस करणार आहे. त्याचसोबत यामध्ये पॉवरफुल बॅटरी मिळणार आहे. मिवी प्ले ब्लूटूथ स्पीकरचे डिझाइन अत्यंत शानदार आहे. याची खरी किंमत 899 रुपये आहेय मात्र या वायरलेस स्पीकरला इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत फक्त 799 रुपयांत खरेदी करता येणार आहे. विक्रीसाठी स्पीकर अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे.

मिवी ने एप्रिल मध्ये MiVi Collar Classic ब्लूटूथ इअरफोन भारतीय बाजारात उतरवला होता. या इअरफोनची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास MiVi Collar Classic इअरफोन MEMS माइकसह येणार आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 दिले आहे. या व्यतिरिक्त युजर्सला नेकबँड मध्ये कंट्रोल बटण मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून फोन उचलता किंवा बंद करता येणार आहे.(Identity Theft ची भीती आहे? tafcop.dgtelecom.gov.in वर असे पहा तुमच्या नावावर किती Unauthorised SIMs आहेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवाल)

Mivi Collar Classic इअरफोन मध्ये गुगल असिस्टंट आणि सिरी वॉइस असिस्टंटचा सपोर्ट दिला आहे.  त्याचसोबत या इअरफोनमध्ये शानदार साउंडसाठी पॉवरफुल डीप बास दिला आहे. तर याच्या नेकबँडचे वजन अत्यंत कमी असून ते सुद्धा सहज आपल्यासोबत घेऊन जाता येणार आहे.