कोविड 19 संकटात सध्या identity theft च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. घोटाळेबाजांकडून तुमच्या आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसंस यांची चोरी करून सीम कार्ड्स विकत घेतली जाऊ शकतात. त्यामुळे हा घोटाळा तुमच्या नावे होऊ नये म्हणून तुम्हीच दक्ष राहणं गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत याची तुम्ही ऑनलाईन छाननी करू शकता.
टेलिकम्युनिकेशन विभागाकडून नुकतेच याबाबत एक पोर्टल बनवण्यात आले आहे. tafcop.dgtelecom.gov.in यावर ग्राहकांच्या रक्षणासाठी आणि घोटाळ्यांचा शोध लावण्यासाठी माहिती चेक करता येऊ शकते. या वेबसाईटवर तुमच्या नावाने रजिस्टर सीम कार्ड्सची माहिती मिळू शकते.
तुमच्या नावावर असलेले मोबाईल नंबर कसे पहाल?
- TAFCOP ची वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in ला भेट द्या.
- तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यानंतर त्यावर ओटीपी व्हॅलिडेट करा.
- यानंतर तुमच्या नावाने रजिस्टर सार्या मोबाईल क्रमाकांची माहिती मिळेल.
- या यादी मधील तुम्हांला नको असलेले किंवा तुमचे नसलेले नंबर ब्लॉक करण्याची संधी मिळेल.
- यानंतर तुम्हांला तिकीट आयडी मिळेल त्याच्या आधारे तुम्ही ही प्रक्रिया ट्रॅक करू शकता.
दरम्यान तुम्हांला जे नंबर हवे आहेत ते ठेवण्यासाठी काहीच विशेष करायचे नाही. तसेच सध्या ही यंत्रणा देशभर सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. टेलिकम्युनिकेशन विभागाकडून हळू हळू ती देशाच्या कानाकोपर्यात नेण्याचं काम सुरू आहे. सरकारी नियमावली नुसार देशात एका व्यक्तीला केवळ 9 नंबर इश्यू केले जाऊ शकतात.