Microsoft (Photo Credits: Wikimedia Commons)

मायक्रोसॉफ्टने अत्यंत धोकादायक 'Lumma Stealer' मालवेअरवर कायदेशीर कारवाई करत 394000 Windows संगणकांना लागलेली मालवेअरची लागण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 21 मे 2025 रोजी मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगपोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली. 16 मार्च ते 16 मे 2025 दरम्यान 'Lumma Stealer' नावाच्या माहिती-चोरणाऱ्या मालवेअरने जगभरात विंडोज सिस्टम्सवर हल्ला केला. या मालवेअरचा उद्देश ब्राऊजर, अ‍ॅप्लिकेशन्स आणि क्रिप्टोकरन्सी वॉलेट्समधून माहिती चोरून घेणे हाच होता. यासोबतच हे मालवेअर इतर धोकादायक सॉफ्टवेअर्सही इन्स्टॉल करण्यासाठी वापरले जात होते.

काय करते Lumma Stealer?

'Lumma Stealer' मालवेअर वापरकर्त्यांचे खालील संवेदनशील डेटा चोरते:

  • लॉगिन यूझरनेम आणि पासवर्ड, सेव्ह केलेले कुकीज,ऑटोफिल माहिती, क्रिप्टो वॉलेट डिटेल्स, अ‍ॅप्लिकेशन टोकन्स
  • हे मालवेअर केवळ माहिती चोरण्यापुरते मर्यादित नसून, याचा वापर करून हॅकर्स रॅन्समवेअर किंवा इतर मालवेअर्सही वापरू शकतात.

मायक्रोसॉफ्टकडून कायदेशीर पावले

मायक्रोसॉफ्टने याच्या मागे असलेल्या सायबर गुन्हेगारांविरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे. कंपनीने स्पष्ट केलं की, 'Lumma Stealer' हे मालवेअर जगभरातील Windows युजर्ससाठी मोठा धोका आहे आणि त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांसोबत काम सुरू आहे. (हेही वाचा, Microsoft Layoffs Coming: मायक्रोसॉफ्ट मध्ये Underperforming Employees ला मिळनार नारळ? पुन्हा नोकरकपातीची माहिती)

“हा खटला आमच्या सुरक्षा मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. Windows वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत,” असे मायक्रोसॉफ्टने आपल्या निवेदनात सांगितले.

मायक्रोसॉफ्टकडून अधिकृत कारवाई

वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे सल्ले

  • मायक्रोसॉफ्टने विंडोज वापरकर्त्यांना आणि IT प्रशासनांना पुढील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:

    ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा

  • विश्वासार्ह अँटीव्हायरस वापरा
  • अनोळखी लिंक्स किंवा फाइल्सवर क्लिक करू नका
  • 2-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (MFA) सक्षम करा

मालवेअर-अ‍ॅज-अ-सर्व्हिस’ (MaaS) विरोधात मोहिम

'Lumma Stealer' ही मालवेअर सेवा भाड्याने देणारी (MaaS) प्रणाली आहे. यामुळे गुन्हेगारांनी ती कस्टम हल्ल्यांसाठी वापरली. मायक्रोसॉफ्टने ही प्रणाली उध्वस्त करण्यासाठी कठोर कायदेशीर आणि तांत्रिक उपाययोजना सुरू केल्या आहेत. 394000 संगणक संक्रमित झाल्यानंतर, 'Lumma Stealer' प्रकरणामुळे जागतिक सायबर सुरक्षेच्या पातळीवर खळबळ उडाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या या कारवाईमुळे सायबर सुरक्षेच्या लढ्याला मोठे बळ मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टबद्दल थोडेसे

मायक्रोसॉफ्ट ही एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे जी सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमधील नवोपक्रमासाठी ओळखली जाते. बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी 1975मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने विंडोज, ऑफिस, अझ्युर आणि इतर उत्पादनांसह डिजिटल जगाला आकार दिला आहे. मायक्रोसॉफ्ट कृत्रिम बुद्धिमत्ता, गेमिंग (एक्सबॉक्स) आणि एंटरप्राइझ सोल्यूशन्ससह अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करते, ज्यामुळे उद्योगांमध्ये प्रगती होते. प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला अधिक साध्य करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या ध्येयासह, ते जगभरात डिजिटल परिवर्तन, सुरक्षा आणि उत्पादकता साधनांमध्ये आघाडीवर आहे.