चीनच्या (China) सर्वात मोठ्या रॉकेटचे वेरिएंट Long March 5B हे 8 मे रोजी पृथ्वीच्या वातावरणात दाखल होण्याची शक्यता आहे. हे रॉकेट आऊट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे रॉकेटच्या लँडिंगबद्दल एक भीती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात चीनने 12.5 मेट्रीक टनचे Tianhe मॉ़ड्युल अवकाशात लॉन्च केले होते. या रॉकेटच्या काही पार्ट शनिवारी पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे. federally funded Aerospace Corp ने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटचे हे पार्ट्स अतिवेगाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतील आणि पॅसिफिक महासागराजवळ आदळण्याची शक्यता आहे. परंतु, यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. (तिसर्या प्रयत्नात SpaceX चे सर्वात मोठे रॉकेट यशस्वीरित्या लँड; मात्र, थोड्याच वेळात विस्फोट होऊन बनला आगीचा गोळा)
Pentagon ने दिलेल्या माहितीनुसार, ते या पडणाऱ्या पार्ट्सचे ट्रॅकिंग करत आहेत. परंतु, हे पार्ट्स नेमके कोणत्या जागी पडतील, याचा अंदाज बांधणे शक्य नाही. पृथ्वीवर पडण्याच्या काही तास अगोदरच आम्ही याचे अचूक लँडिंग लोकेशन सांगू शकतो.
Long March 5B रॉकेट उडवण्याचा आमची कोणतीही योजना नाही. आशा आहे हे रॉकेट एखाद्या निर्जन ठिकाणी पडावे, जेणेकरुन कोणतीही जिवीतहानी होणार नाही, असे युएसचे डिफेन्स सेक्रेटरी Lloyd Austin यांनी 6 एप्रिल रोजी सांगितले.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पडणाऱ्या रॉकेट्सचे पार्ट्स अधिक धोकादायक नाहीत. एखाद्या अनियंत्रित रॉकेटमधून पार्ट्स पृथ्वीवर पडणे ही घटना नवी नाही. या प्रकराच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत. मागील वर्षी Long March 5B च्या दुसऱ्या रॉकेटचे पार्ट लॉस एंजलिस आणि न्यु यॉर्क सिटीला पार करत अंटलांटिक महासागरात पडले. ऑऊट ऑफ कंट्रोल रॉकेट लॉन्च करणे ही बहुदा चीनची सवय झआली आहे. मागील वेळेस Long March 5B रॉकेट लॉन्चिंगवेळी तेव्हा लोखंडाचे मोठे रॉड्स आणि पार्ट्स मोठ्या गतीने आकाशातून खाली पडून Ivory Coast मधील बऱ्याच इमारतींचे नुकसान झाले होते.
एखाद्या छोट्या प्लेन क्रॅशसारखे या पार्ट्सचे लँडिंग होणार असल्याची शक्यता Harvard University चे astrophysicist Jonathan McDowell यांनी दिली. परंतु, हे पार्ट्स पृथ्वीच्या वातावरणात जळून जातील आणि लोकांना कोणताही धोका उरणार नाही. असे ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.