SpaceX Rocket Explodes: एलन मस्क (Elon Musk) च्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कॉर्पोरेशन (SpaceX) चे नवीन आणि सर्वात मोठे रॉकेट आपल्या तिसर्या चाचणी उड्डाणात प्रथमचं यशस्वीरित्या लँड झाले. मात्र, थोड्याच वेळानंतर स्फोट झाला आणि रॉकेटला आग लागली. स्पेसएक्सचे अंतराळ यान स्टारशिप एसएन10 संध्याकाळी सव्वा पाच वाजता बोला चिका येथून लॉन्च करण्यात आले. याचा व्हिडिओ कंपनीने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे.
वेबसाइटनुसार, रॉकेटने लँड पॅडला स्पर्श करण्यापूर्वी 10 किलोमीटर अंतरापर्यंत उड्डाण केले. लँडिंगनंतर थोड्याचं वेळात रॉकेटचा स्फोट झाला आणि त्याचा आगीचा गोळा बनला. या रॉकेटचे तीन प्रयत्नांमध्ये प्रथमचं यशस्वी लँडिंग झाले. (वाचा -Richest Person In The World: टेस्लाच्या Elon Musk यांना मागे टाकत Amazon चे Jeff Bezos पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या संपत्ती)
दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, या रॉकेटचे यशस्वी लँडिंग हे अंतराळ प्रवासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांचे ध्येय 2023 पर्यंत चंद्रावर 12 लोकांना पाठवण्याचे आहे. या योजनाच्या दिशेने सध्या काम सुरू आहे.
Live feed of Starship SN10 flight test → https://t.co/Hs5C53qBxb https://t.co/Au6GmiyWN8
— SpaceX (@SpaceX) March 3, 2021
या व्यतिरिक्त, त्याच्या योजनेत नासाच्या अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर नेणे आणि नंतर त्यांना मंगळावर पाठविण्याचे ध्येय देखील समाविष्ट आहे. सध्या कंपनी अद्याप त्याच्या पहिल्या कक्षीय उड्डाणासाठी स्टारशिप तयार करण्याचे काम करीत आहे. जे या वर्षाच्या शेवटी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी मंगळवारी एलन मस्क यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मला खात्री आहे की आम्ही 2023 च्या आधी बर्याच वेळा स्टारशिपसह ऑर्बिटमध्ये पोहोचू आणि त्यानंतर 2023 पर्यंत तिथे मानवांना पोहोचणे सुरक्षित होईल.