Richest Person In The World: टेस्लाच्या Elon Musk यांना मागे टाकत Amazon चे Jeff Bezos पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या संपत्ती
जेफ बेझोस (Photo Credits: toopanda)

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे (Amazon) जेफ बेझोस (Jeff Bezos) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकत ते या स्थानावर पोहोचले आहेत. यावर्षी बेझोस यांना दोनदा हरवून मस्क यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, 186  अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बेझोस पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने त्यांची संपत्ती 15.2 अब्ज डॉलरने घटली. यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले.

सध्या मस्क यांची नेटवर्थ 183 अब्ज डॉलर्स आहे. जेफ बेझोसने सलग तीन वर्षे जगातील सर्वात स्थ्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. मागील महिन्यात ते या यादीमध्ये मागे पडले होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 191.2 अब्ज होती. त्यानंतर मस्क यांनी ती जागा घेऊन ते 6 आठवड्यांपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. (हेही वाचा: Gujarat: मुकेश अंबानी 250 एकर जमिनीवर उभारत आहेत जगातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय; 2023 मध्ये होणार सुरू)

या वर्षाबद्दल बोलायचे तर, टेस्लाचे मालक एलोन मस्कची मालमत्ता 2050 दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे. तर जेफ बेझोसच्या संपत्तीत केवळ 884 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. पहिल्या 5 श्रीमंत उद्योजकांमध्ये बेझोस आणि मस्कनंतर बिल गेट्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 13 हजार 700 दशलक्ष डॉलर्स आहे. चौथ्या क्रमांकावर बॅनॉर्ड अर्नाल्ट आहेत, तर पाचव्या क्रमांकावर 10 हजार 400 कोटी दशलक्ष डॉलर्ससह फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आहेत. या यादीत भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर आहेत.

अंबानी यांच्याकडे एकूण 7970 कोटी डॉलर्सची संपत्ती आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर अंबानींच्या संपत्तीत 303 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. आरआयएल आणि जिओमध्ये मोठ्या गुंतवणूकीमुळे मुकेश अंबानी गेल्या वर्षी श्रीमंत यादीत पहिल्या 5 मध्ये पोहोचले होते.