Job Crisis Due to Automation: ऑटोमेशनमुळे देशातील 69 टक्के नोकऱ्या संकटात; जगात कोट्यावधी लोक होणार बेरोजगार
Job Cut (Photo Credits: Twitter)

भारतासह जगभरात ऑटोमेशनचा (Automation) वापर वाढत असल्याने, लाखो लोकांच्या नोकऱ्या संकटात येणार आहेत. ऑटोमेशनचा भारतीय कामगार वर्गालाही फटका बसणार आहे. एका अहवालानुसार, यांत्रिकीकरणामुळे येत्या 20 वर्षात 69 टक्के नोकऱ्या जाऊ शकतात. फॉरेस्टरच्या अहवालानुसार ऑटोमेशनमुळे देशात 16 कोटी नवीन कामगार तयार होऊ शकतात. अहवालात दावा करण्यात आला आहे की 2040 पर्यंत देशातील कार्यरत असलेल्या लोकसंख्येची संख्या सुमारे 1.1 अब्ज असेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार देण्याचे आव्हान देशासमोर उभे राहणार आहे.

अशाप्रकारे नवीन रोजगार निर्माण करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असेल. जागतिक बँकेच्या संशोधन अहवालानुसार, ऑटोमेशनमुळे भारतात 69 टक्के आणि चीनमध्ये 77 टक्के नोकऱ्या जाऊ शकतात. फॉरेस्टरचे प्रिन्सिपल अॅनालिटिकल एक्सपर्ट मायकेल ओ'ग्रेडी यांनी म्हटले आहे की, भारतात अशी तरुण लोकसंख्या आहे ज्यांचे सरासरी वय 38 वर्षे आहे. ऑटोमेशनमुळे युरोपीय देशांमध्येही रोजगारासाठी मोठे संकट निर्माण होणार आहे.

भौतिक रोबोट ऑटोमेशनमुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मोठी लोकसंख्या बेरोजगार होऊ शकते. हेच संकट भारत, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यासमोर उभे राहणार आहे. या देशांमधील ऑटोमेशनमुळे 2040 पर्यंत 63 दशलक्ष नोकर्‍या संपुष्टात येतील. बांधकाम क्षेत्रापासून कृषी क्षेत्रापर्यंत सुमारे 24.7 कोटी नोकऱ्या जाऊ शकतात. (हेही वाचा: समोर आले 8व्या वेतन आयोगाबाबत नवे अपडेट; नव्या सूत्राने वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार)

जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम किम म्हणाले, ‘यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाने पारंपारिक औद्योगिक उत्पादनात व्यत्यय आणला आहे आणि अनेक मॅन्युअल नोकऱ्या काढून टाकल्या आहेत. अमेरिकेसह प्रत्येक देशातील लोकांना या ट्रेंडचा फटका बसला आहे. जर असे मोठ्या प्रमाणावर घडले आणि या देशांमध्ये नोकऱ्या गेल्या तर या देशांसाठी आर्थिक विकासाचे कोणते मार्ग उपलब्ध होतील हे समजून घ्यावे लागेल आणि त्यानुसार पायाभूत सुविधांबाबत भूमिका घ्यावी लागेल.’