Pinaka Rocket Test fired (Photo Credits: PIB)

भारत आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही दारुगोळा निर्यातदार देशांपैकी (India to Export Pinaka Launchers) एक देश ठरत आहे. नुकताच भारत आमि आर्मोनिया (Armenia) यांच्यात शस्त्रास्त्र खरेदीसंदर्भात एक करार झाला. या करारानुसार भारत आर्मोनियाला शस्त्रे आणि दारुगोळा पोहोचवणार आहे. त्यासाठी सुमारे 250 लाख कोटींचा करार झाल्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने देल आहे. सध्या आर्मोनिया आणि त्यांचा शेजारी अझरबैजान (Azerbaijan) यांच्यात काही कारणांवरुन संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा आहे.

भारत स्वदेशी विकसित मल्टी-बॅरल पिनाका लाँचर्स, अँटी-टँक रॉकेट आणि इतर श्रेणीतील दारूगोळा सोव्हिएत प्रदेशात (माजी ) पाठवणार आहे. पिनाका प्रणाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे विकसित केली गेली आहे आणि भारतीय खाजगी कंपन्यांनी तयार केली आहे. रॉकेट प्रणाली, जी सध्या भारतीय लष्कराच्या सेवेत आहे, 44 सेकंदात 12 HE रॉकेटचा सल्व्हो उडवू शकते. (हेही वाचा, Pinaka Rocket MK-1: जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या पिनाका रॉकेट MK-1ची पोखरणमध्ये चाचणी यशस्वी)

सध्या भारतीय लष्कराच्या सेवेत जी रॉकेट प्रणाली आहे ती अवघ्या 44 सेकंदात 12 HE रॉकेटचा धुव्वा उडवू शकते. दुसऱ्या एखाद्या देशात पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीची निर्यात करण्याची भारताची ही पहिलीच वेळआहे. दरम्यान, दक्षिण आशियातील राष्ट्राने यापूर्वीच आर्मेनियाला शस्त्रे निर्यात केली आहेत. भारताने आर्मेनियाला चार स्वाती रडार पुरवण्यासाठी $43 दशलक्षचा करार 2020 मध्ये केला होता.

भारत आपली शस्त्रास्त्रांची निर्यात वाढवू पाहत आहे आणि आपल्या ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. केंद्राने 2025 पर्यंत परदेशात 35,000 कोटी रुपयांची शस्त्रे विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

विशेष म्हणजे भारताच्या संरक्षण सामग्रिच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये, भारताने 2014-15 मधील $23 दशलक्षच्या तुलनेत $90 दशलक्ष किमतीची उपकरणे निर्यात केली. या वर्षी जानेवारीमध्ये, भारताने देशाच्या नौदलाला ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र प्रदान करण्यासाठी फिलिपिन्सशी $ 375 दशलक्षचा करार केला. फिलिपाइन्सचे नौदल ब्राम्होसचा वापर हे समुद्रकिनारपट्टीवरुन समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्र म्हणून वापरेल. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारताच्या DRDO आणि रशियाच्या NPO Mashinostroyeniya यांनी संयुक्तपणे बनवले आहे.