Holi 2021 Special Tips: होळी खेळताना स्मार्टफोनमध्ये चुकून पाणी गेल्यास 'या' सोप्या टिप्स ठरतील उपयोगी
Phone (PC - Twitter)

Holi 2021 Special Tips: रंग आणि पाण्याशिवाय होळीचा (Holi) सण पूर्णपणे अपूर्ण आहे. परंतु, होळी खेळताना तुम्हाला आपल्या स्मार्टफोनची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, स्मार्टफोनमध्ये पाणी किंवा रंग गेल्यास तुमचा फोन निकामी होऊ शकतो. एकदा फोन खराब झाला की, तुम्हाला सर्व्हिस सेंटरला फेऱ्या घालाव्या लागतात. परंतु, आम्ही या खास लेखातून आपल्याला काही टिप्स देत आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या फोनमध्ये पाणी किंवा रंग गेल्यास घरबसल्या दुरुस्ती करू शकता. चला तर मग या टिप्सबद्दल जाणून घेऊयात... (वाचा - होळीच्या वेळी कार आणि बाइक्सचा रंगांपासून बचाव करण्यासाठी 'या' टीप्स येतील कामी)

प्रथम बॅटरी काढा

होळी खेळत असताना तुमच्या फोनमध्ये थोडेसे पाणी गेले असेल तर प्रथम फोनची बॅटरी काढून टाका. यानंतर बॅटरी आणि फोन दोन्ही सुकविण्यासाठी ठेवा. परंतु, हे करत असताना बॅटरी खराब होऊ शकते म्हणून ती जास्त वेळ उन्हात ठेवू नका. (वाचा - Holi 2021: भारतात 'या' ठिकाणी लोक होळी खेळत नाहीत; त्यामागील रहस्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का)

हेयर ड्रायर वापरू नका -

बर्‍याच वेळा फोन ओला झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने लोक हेयर ड्रायर वापरतात. जे अतिशय धोकादायक आहे. यामुळे फोन दुरुस्त होण्याची शक्यता कमी असून त्यात आग लागण्याची भीती असते. याशिवाय फोनमध्ये अनेक हलके घटक असतात, जे हेयर ड्रायरच्या वापरामुळे खराब होतात.

फोन तांदूळामध्ये ठेवा -

होळी खेळताना आपल्याकडे फोनवर थोडेसे रंग किंवा पाणी पडल्यास तो लगेच साफ करा किंवा तांदूळात टाका. तांदूळात फोन ठेवल्यास फोनमध्ये पाणी जाण्याचा धोका कमी होतो. तांदूळ फोनमध्ये असलेले पाणी शोषून घेतो. थोड्या वेळा नंतर, फोन काढा आणि तो पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर चालू करा.

चार्जर वापरू नका -

फोनमध्ये थोडेसे पाणी किंवा रंग गेल्यास चार्जर वापरू नका. कारण थोडी घाई केल्याने आपला फोन पूर्णपणे खराब होतो. आपल्याला फोनमधील पाणी पूर्णपणे कमी झाल्याची खात्री झाल्याशिवाय फोन चालू चार्जिंगला लावू नका. फोन व्यवस्थित सुरू झाल्यानंतर तुम्ही तो चार्जिंगला लावू शकता.

टीप: वरील टिप्स या केवळ फोन कमी पाण्यात पडल्यासचं उपयोगी येतील करतील. परंतु, तुमच्या फोनमध्ये अधिक पाणी गेले असेल, तर या टिप्स पाळण्याऐवजी थेट सर्व्हिस सेंटरवर मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन जा.