Twitter logo (Photo courtesy: Twitter)

ट्वीटरवरील (Twitter)काही प्रसिद्ध लोकांचे ट्वीटर अकाउंट गुरुवारी हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली. यामध्ये Elon Musk, Bill Gates, Jeff Bezos आणि Apple या सारख्या अकाउंट्सचा समावेश आहे. हे अकाउंट्स हॅक करण्यासाठी हॅकर्सने क्रिप्टोकरन्सी स्कॅम प्रमोट करणारे एक ट्वीट केले. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, केन वेस्ट, किम कादर्शिया वेस्ट, वॉर्नबफेट, जेफ बेजोस आणि माइक ब्लूमबर्ग यांच्या ही ट्वीटर अकाउंट्सवरुन या पद्धतीची पोस्ट करण्यात आली. खरंतर ज्या वेळी हॅकर्सकडून ट्वीट अकाउंट हॅक करण्यात येते त्यावेळी एखाद्या युजर्सची महत्वाची माहिती चोरी होण्याची सर्वाधिक शक्यता असते. याच्या आधाराने फसवणूकीची कामे पार पाडली जाऊ शकतात. अशातच जर तुम्हाला तुमचे ट्वीटर अकाउंट हॅक होण्यापासून बचाव करायचा असल्यास पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवा.

>>काय करावे आणि काय करु नये?

- Twitter युजर्सने एक 10 कॅरेक्टर्स असेल असा Strong पासवर्ड सेट करावा.

-पासवर्ड सेट करतेवेळी तुमच्या की-बोर्डवरील अप्परकेस, लोअरकेस, नंबर किंवा सिंम्बॉल यांचा वापर करावा.

-प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटसाठी युजर्सने वेगवेगळा पासवर्ड सेट करावा.

-पासवर्ड जनरेट करतेवेळी खासगी माहिती जसे फोन क्रमांक, बर्थ डेट यांचा वापर करु नये.

-तसेच पासवर्ड तयार करताना डिक्शनरी वर्ड जसे iLoveYou यांचा वापर करु नये.

-त्याचसोबत सीक्वेंस नुसार म्हणजेच abcd1234 याचा सुद्धा वापर करु नये.

(हेही वाचा-Twitter Accounts Hacked: अमेरिकेमध्ये बराक ओबामा, बिल गेस्ट सह हाय प्रोफाईल अकाऊंट्स हॅक; ट्वीटरचे सीईओ Jack Dorsey यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया)

> >या गोष्टी जरुर लक्षात ठेवा

-लॉगिन वेरिफिकेशनसह OTP वापरताना सिक्युरिटी लेअर वाढवू शकता. त्यामुळे तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित राहू शकते.

-पासवर्ड रिसेट करण्यासाठी Email किंवा फोन क्रमांक जरुर द्या.

-कोणत्याही थर्ड पार्टीला तुमचे युजर्सनेम किंवा पासवर्ड देऊ नका. जे तुम्हाला फॉलोअर्स वाढवू अशी ऑफर करतील.

-नेहमीच तपासून पहा की तुमचे कंप्युटर सॉफ्टवेअर आणि ब्राउजर अपडेटेड आहे. तसेच फोन किंवा लॅपटॉपमध्ये अॅन्टी वायरसचा वापर करा.

तर वरील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा. तसेच सोशल मीडियावर एखादी पोस्ट करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेबाबत सुद्धा जाणून घ्या. कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्वीटरने खोटी माहिती देणाऱ्या अकाउंटवर कारवाई केली होती.