Twitter Accounts Hacked: अमेरिकेमध्ये बराक ओबामा, बिल गेस्ट सह हाय प्रोफाईल अकाऊंट्स हॅक; ट्वीटरचे सीईओ Jack Dorsey यांनी हा प्रकार  धक्कादायक असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया
जैक डॉर्सी (Photo Credits: IANS)

अमेरिकेमध्ये आज जो बायडन, माजी अध्यक्ष बराक ओबामा, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अ‍ॅपल सारख्या महत्त्वाच्या व्यक्तींची ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान बिटकॉन या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या उद्देशाने केले गेले असल्याचे संदेश त्य्यांच्या अकाऊंटवर झळकले. त्यानंतर काही वेळातच ते डिलीट देखील झाले आहेत. दरम्यान हा प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ट्वीटरच्या सीईओ कडून देण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये सारी महत्त्वाची अकाऊंट्स हॅक झाल्यानंतर पोस्ट केलेल्या लिंकमध्ये बिट कॉईनच्या व्यवहारांची एक लिंकही टाकण्यात आली होती. तसंच तुम्ही आम्हाला 5 हजार बिट कॉईन्स देणार आहात असा मेसेज दिसला होता.

ट्वीटरचे सीईओ जॅक ट्वीट

ट्वीटरचे सीईओ जॅक यांनी हा कठीण काळ आहे. आम्ही देखील हैराण आहोत. सध्या या गोष्टीचा आम्ही तपास करत आहोत. लवकरच हा प्रकार कसा झाला त्याची माहिती दिली जाईल. हॅकिंग रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी काही अकाऊंट्स बंद देखील करण्यात आली आहेत. ती पुन्हा सुरू केली असावीत मात्र आम्ही तपास करू असे त्यांनी म्हटलं आहे.

ट्वीटरवर अकाऊंट्स हॅक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील अशाप्रकारे नामी व्यक्तींची अकाऊंट्स हॅक झाली आहेत. बिटकॉईन ही डिजिटल करंसी आहे. त्यांना डिजिटल बॅंकेमध्ये ठेवले जाते.

दरम्यान अमेरिकेमध्ये अशा नामवंतांची अकाऊंट्स हॅक झाल्यानंतर सामान्य युजर्सनी देखील काही मिम्स शेअर केले आहेत.