Communication | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

भारत सरकार (Government) मल्टीमीडिया मेसेजींग सिस्टम (Government Instant Messaging System) लवकरच लॉन्च करत आहे. या अॅपची सध्या चाचणी सुरु आसून, ती यशस्वी झाल्यानंतर ही सिस्टीम युजर्सच्या सेवेत दाखल होईल. प्राप्त माहितीनुसार, ही मल्टीमीडिया संदेश प्रणाली ही व्हॉट्सॲप आणि टेलीग्राम आदींप्रमाणे असेन. ही प्रणाली म्हणचे एक प्रकारचे अॅपच असून, GIMs असे या प्रणालीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार या प्रणालीची चाचणी सध्या ओडीशा आणि केरळ यांसारख्या राज्यामध्ये सुरु आहे. तसेच, ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर GIMs या प्रणालीचा वापर पहिल्यांदा भारतीय नावीक दल करणार असल्याचे समजते.

इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार GIMs अॅप नॅशनल इन्फर्मेशन सेंटर, केरळ यूनिट ने डिजाईन केले आहे. तसेच, हेच युनीट हे अॅप तयारही करत आहे. या अॅपचा वापर सरकारी कर्मचारी आणि सहकारी संस्था अधिकृतपणे संवाद साधण्यासाठी करेन. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात GIMs चे आयओएस व्हर्जन जारी तकरण्यात आले. जे आयओएस 11 आणि त्याच्याही पेक्षा वर्जनसाठी होते. हे व्हर्जन अॅण्ड्रॉईड प्रणालीसाठीही काम करेन.

दरम्यान, असेही सांगितले जात आहे की, ओडिशा सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंट आपल्या एका स्वतंत्र विभागात पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून या अॅपची चाचणी घेत आहे. अनेक कर्मचारी हे अॅप फोनमध्ये इन्स्टॉलही करु लागले आहेत. दरम्यान, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या विदेशी अॅपसोबत सातत्याने युजर्सच्या सुरक्षीततेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने अशा प्रकारचे अॅप लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. GIMs अॅपही एंड-टू-एंड इंक्रिप्टेड असेन. दरम्यान, हे अॅप केवळ खासगी चॅटीगसाठी असेन. कोणत्यीही ग्रुपसाठी नव्हे. (हेही वाचा, USB Condom म्हणजे काय? तो कशासाठी वापरतात? 'यूएसबी कंडोम' किती रुपयांना मिळतो?)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच भारतातील अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वकील, विचारवंत, लेखक आदी मंडळींच्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोनमध्ये घुसून खासगी माहिती तसेच मोठ्या प्रमाणावर डेटा चोरला गेला, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंत भारत सरकारने या संदर्भात एक पत्रही संबंधीत कंपनीला लिहिले होते. व्हॉट्सअॅपने स्वत:ही अशा प्रकारची घुसखोरी झाल्याचे मान्य केले होते.