USB Condom हा शब्द आज जोरदार चर्चेत आला आहे. अनेकांन कळेना यूएसबी कंडमो हा प्रकार नेमका आहे तरी काय? काहींना वाटते की हे एखादे टेक्नॉलजी उत्पादनांशी संबंधी उपकरण आहे. तर, काहींना वाटते लैंगिक (Sex) संबंधांवेळी वापरल्या जाणाऱ्या एखाद्या कंडोमचा (Condom) हा नवा ब्राँड असावा. अनेकांना अनेक कारणांसाठी या शब्दाबद्दल उत्सुकता आहे. पण, हा केवळ एक शब्द नाही. तर खरोखरच एक उपकरण आहे आणि त्याला भारतीय टेक बाजारातून चांगली मागणीही आहे. नावावर जाऊ नका. कारण हा लैंगिक संबंधावेळी वापरण्याचा कंडोम नव्हे. तर, यूएसबी कंडोम स्मार्टफोन सेफ्टी (Smartphone Security) आणि डाटा सिक्योरिटी आदी कारणांसाठी वापरला जातो. जाणून घ्या USB Condom म्हणजे काय? नेमका कसा आणि कशासाठी वापरतात 'यूएसबी कंडोम'?
मोबाईल सुरक्षा (Smartphone Security)
स्मार्टफोन हा आज आमच्या जीवनचा अविभाज्य भाग झाला आहे. इतका की, बँकींग व्यवहार, खरेदी विक्री यांसारख्या मोठमोठ्या बँकींग व्यवहारांपासून ते पान, चुना, तंबाखू, विडी, सिगारेट यांसारख्या साध्या गोष्टींच्या खरेदीसाठीही स्मार्टफोनच्या माध्यमांतून ऑनलाईन बँकींगचा वापर करत आहे. सोबतच आम्ही स्मार्टफोनमधील असंख्य फिचर्स, अॅप वापरत असतो. ज्यामुळे मोबाईलची बँटरी संपते. परिणामी आम्ही जागा मिळेल तेथे आपला स्मार्टफोन चार्जिंगला लावतो. ज्यात विमानतळ, स्टेशन्स, हॉटेल, पब्लिक टॉयलेट, शॉपिंग सेंटर आणि इतरही अनेक ज्ञात अज्ञात सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी असलेल्या जागांचा वापर स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी वापरतो. आम्ही कल्पनाही करत नाही की, ही जागा स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी योग्य आहे की नाही. इथेच हॅकर्सचे फावते.
इथे यूएसबी कंडमो कामी येतो
दरम्यान, युजर्सच्या या आगतीकचेताचच फायदा घेऊन हॅकर्च अनेकांच्या मोबाईलमध्ये घुसतात. त्यांचा खासगी डेटा चोरतात. तसेच, मोबाईलमध्ये व्हायरसही पसरवतात. असे घडल्याने युजर्सच्या स्मार्टफोनला हानी तर पोहोचतेच परंतू, त्याला मोठ्या आर्थिक हानीचाही सामना करावा लागतो. याशिवया अनेक गुन्हेगारी कृत्यांसाठीही युजर्सचा स्मार्टफोन त्याच्या नकळत वापरला जाऊ शकतो. इथेच यूएसबी कंडमो कामी येतो. कसा ते पुढे घ्या जाणून. (हेही वाचा, जास्त पैसे मोजूनही तुमचे इंटरनेट स्लो चालतंय? त्यासाठी आवश्यक आहे 'नेट न्यूट्रॅलिटी')
सायबर हल्यापासून सुरक्षा (Cyber Attack)
सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणांहून युजर्सच्या मोबाईलमधून होत असलेल्या डेटा चोरीस किंवा पोहोचविल्या जाणाऱ्या हानीस पायबंध घालण्याच्या दृष्टीने बाजारात एक डेटा ब्लॉकर्स आले आहे. या डेटा ब्लॉकर्सलाच यूएसबी कंडोम असे नाव देण्यात आले आहे. हे कंडोम वास्तवात कोंडोमप्रमाणे लेटेक्स असत नाहीत. परंतू, आपल्या स्मार्टफोनला किवा टेक्नॉजीकल वस्तूंना (पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, स्मार्टफोन वैगेरे) मात्र सुरक्षाकवच देते. यूएसबी कंडोम आपल्या स्मार्टफोनला जूस जॅकिंगपासून वाचवते. जूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे. ज्यात सार्वजनिक यूएसबी पोर्ट च्या माध्यमातून आपल्या मोबाईलला धक्का पोहोचवला जातो. तसेच, आपल्या मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले जाते. कोणत्याही स्मार्टफोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होताच युजर्सची खासगी माहिती हॅकरपर्यंत पोहोचते. (हेही वाचा, तुमचा फोन रेकॉर्ड केला जातोय? 'या' पद्धतीने तपासून पहा)
यूएसबी कंडोम रचना, आकारमान, किंमत (USB Condom Price)
यूएसबी कंडोम हे छोट्या अॅडेप्टरप्रमाणे असतात. ज्यात इनपूट आणि आऊटपूट पोर्ट असतात. हे एक अॅडेप्टर मोबाईलला पॉवर पुरवतात. मात्र, डाटा एक्स्चेंड करण्यास मात्र पूर्णपणे विरोध दर्शवतात. प्राप्त माहितीनुसार यूएसबी कंडोमची अमेरिकी बाजारात किंमत 10 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत साधारण 714 रुपये इतही आहे. यूएसबी कंडोम आकाराला इतका छोटा असतो की, आपण हा कुठेही घेऊन जाऊ शकता. भारतीय बाजारात हा 500 ते 1000 रुपये या रेंजमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे.
दावा केला जात आहे की, यूएसबी कंडोम सायबर हल्ल्यापासून सुरक्षा पुरवतात. सायबर हल्ल्याचे परिणाम धोकायादक असतात. इतके की, केवळ मोबाईल चार्जिंक करण्याच्या निमित्ताने ते तुमचे संपूर्ण बँक खाते खाली करु शकतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचे तर, सायबर हल्लेखोरांनी जर आपल्या स्मार्टफोनमध्ये क्रिमिनल मालवेअर इन्स्टॉल केले तर आपला फोन ब्लॉकही होऊ शकतो. फोनच्या माध्यमातून आपले पासवर्ड, बँक खात्याचा तपशील, आपली गोपीनीय माहिती, फोटो, व्हिडिओ आदी गोष्टींची चोरी होऊ शकते. आयबीएमच्या सायबर सिक्योरिटी रिपोर्टच्या अहवालानुसार, मालवेअर कंप्यूटींग पॉवर हायजॅक करतात. ज्यामुळे आपला फोन प्रचंड स्लो होतो. त्यामुळे आता सायबर सुरक्षा सल्लागाहरी युजर्सना 'यूएसबी कंडोम वापरण्याचा सल्ला देऊ लागले आहेत.'