Google Pay Fraud Call: कस्टमर केअर च्या नावाखाली गुगल पे वरुन 'अशी' केली जात आहे फसणवूक (Watch Video)
Google Pay Fraud (File Photo)

कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) ऑनलाईन व्यवहार (Online Transactions) मोठ्या प्रमाणावर वाढला. यामुळे अनेक फायदे आणि गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये झालेली वाढ पाहता फ्रॉडर्सने फसवणुकीसाठी नवनवे मार्ग अवलंबले आहेत. दरम्यान, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी बँका, सरकार आणि इतर संस्थांद्वारे नागरिकांना वेळोवेळी सतर्क करण्यात येत आहे. (Online Fraud: निनावी कॉल्सवर PF अकाऊंट्स सह वैयक्तिक माहिती देणं टाळा; होऊ शकते मोठी फसवणूक)

अलीकडेच एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्ठल यांनी कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेदरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ऑनलाईन व्यवहार वाढल्यामुळे सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ करण्याचा इशारा दिला आहे. तसंच यावर कंपनी सातत्याने काम करत असून फ्रॉडर्सपासून बचाव करण्याचे सुरक्षित उपाय ग्राहकांसमोर सादर करत आहे. ऑनलाईन फसवणुकदारांची काम करण्याची पद्धत याबद्दल सांगत त्यांनी फ्रॉर्ड्सकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. (Online Frauds: धक्कादायक! ऑनलाइन पिझ्झा मागविला अन् अकाऊंटमधील 4 लाख रुपये झाले गायब)

लॉकडाऊन काळात वाढलेल्या ऑनलाईन व्यवहारांचा फायदा घेत फ्रॉडर्सने कस्टमर कअेर एक्झीक्युटीव्ह बनून नागरिकांची फसवणूक केली आहे. गुगल पे फ्रॉडची अशीच एक पद्धत खालील युट्युब व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. यात फ्रॉडर गुगल पे चा कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह म्हणून एका मुलीशी बोलत आहे. पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून पैसे डेबिट करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे.

या व्हिडिओत तु्म्ही पाहू शकाल, गुगल पे वरुन पैसे ट्रान्सफर केल्यानंतर एका मुलीची फेक कस्टमर केअर एक्झीक्युटीव्हशी बोलणे होते. त्यात ती म्हणते की, माझ्या वडीलांनी गुगल पे वरुन भावाला 10 हजार रुपये पाठवले होते. खात्यातून पैसे कट झाले असले तरी ते भावाच्या अकाऊंटला जमा झालेले नाहीत. यावर फेक कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह तिला Pay वर क्लिक करुन युपीआय कोड टाकण्यास सांगतो. मात्र स्मार्ट मुलगी त्याच्या जाळ्यात अडकत नाही. दरम्यान, अशाप्रकारे फसवणूक होत असल्याने ग्राहकांनी सतर्क राहून फ्रॉडर्सच्या भूलथापांना बळी पडू नये.