Online Frauds: धक्कादायक! ऑनलाइन पिझ्झा मागविला अन् अकाऊंटमधील 4 लाख रुपये झाले गायब
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते? यात कोणती सावधगिरी बाळगावी? त्यावरील उपाय, सावधानता आदींबाबत सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाकडून सतत मार्गदर्शन केले जाते. यातच दिल्लीयेथील (Delhi) एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला ऑनलाईन पिझ्झा मागवणे चांगलेच महागात पडले. या महिलेच्या अकाऊंटमधून तब्बल 4 लाख रुपये लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना सावधान राहणे अधिक गरजेचे आहे. कुठलीही साधीशी चूक, दुर्लक्ष किंवा गृहित धरणे आपल्याला किती महागात पडू शकते? हे दिल्लीतील एका महिले डॉक्टरसोबत घडलेल्या प्रकारानंतर आपल्या लक्षात येईल. या महिलेने एका विदेशी वेबसाईटवरून पिझ्झा ऑर्डर केला. मात्र, बिल देण्यात अडचणी येत असल्याने तिने गुगलवर जाऊन त्याठिकाणी असलेले मार्केट शोधून काढले. तिथे मिळालेल्या एका नंबरवर या महिलेने फोन केला. त्यावेळी एका व्यक्तीसह या महिलेचे बोलणे झाले. तसेच तुमची काय समस्या आहे? तुम्हाला येणाऱ्या फोनवर सांगा, असे तो व्यक्ती या महिलेला म्हणाला. त्यांनतर जो फोन आला त्या व्यक्तीने महिलेला एक लिंक पाठवत असल्याचे सांगितले. त्यावरून त्या महिलेला पिझ्झाची ऑर्डर देण्यास सांगितले. परंतु, काही वेळातच या महिलेच्या खात्यातून 4 लाख गायब झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात नवभारत टाईम्सने वृ्त्त दिले आहे. हे देखील वाचा- उत्तराखंड: मोबाईलवरील ऑनलाईन गेम टास्क पूर्ण करण्यासाठी 17 वर्षीय मुलाकडून रस्त्यातच महिलेवर चाकू हल्ला, आरोपी फरार

बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, इमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ज्ञ, पोलिस यंत्रणा ही सूचना करत असतात. परंतु बँकेतून फोन आल्याचे किंवा इतर ऑनलाईन व्यवहार अतिविश्वास ठेवणे अनेकांना भोवले आहे.