Mobile | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मोबाईलवरील ऑनलाईन गेम किती खतरनाक ठरु शकतो याचा प्रत्यय येणारी एक घटना देहरादून येथे घडली आहे. कारण नेहरुनगर येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाने भररस्त्यात महिलेच्या डोक्यात हातोडीसह चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हे प्रकरण एका गेम मध्ये दिलेल्या टास्कमुळे घडले आहे. पोलिसांच्या हाती लागेल्या ऑनलाईन गेम चॅटिंगच्या आधारावर असे सांगितले जात आहे की, हे टास्क पूर्ण करण्यासाठी मुलाने हे पाऊल उचलले आहे.(Delhi: साखळी चोरांना विरोध करणे महिलेच्या जीवावर बेतले; चाकू हल्ल्यात मृत्यू Watch Video)

ही घटना गुरुवारी रात्रीची असून जेव्हा स्वर्ण गंगा एनक्लेवमध्ये राहणाऱ्या ज्योती नेगी वर एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. त्यावेळी ज्योती या रस्त्यावर शतपावली करत होत्या. तसेच पती सिद्धार्थ हे 100 मीटर दूर असलेल्या एका दुकानातून दुध खरेदी करत होते. नेहरु कॉलनीतील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर सिद्धार्थ यांनी असे म्हटले की एका अज्ञात व्यक्तीकडून ज्योतीवर हातोडी आणि चाकू हल्ला करण्यात आला. पोलिसांना घटनास्थळावरुन एक प्रोजेक्ट फाइल, हातोडी आणि भाज्या कापण्यासाठी वापरा जाणारा चाकू मिळाला असून त्यांनी तो ताब्यात घेतला आहे.(Ludhiana: खळबळजनक! 1000 रुपयांसाठी घर मालकाकडून भाडेकरूची हत्या; लुधियाना येथील घटना)

महिलेवर पाठून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी महिलेला मुलाचा फोटो दाखवला असता त्यानेच आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर मुलाने पळ काढला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.