Delhi: साखळी चोरांना विरोध करणे महिलेच्या जीवावर बेतले; चाकू हल्ल्यात मृत्यू (Watch Video)
Viral Video Grabs (Photo Credits: Youtube)

दिल्लीतील (Delhi) आदर्श नगर (Adarsh Nagar) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गळ्यातील साखळी खेचण्याऱ्या गुंडांना विरोध करणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. गुडांनी केलेल्या चाकू हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला आहे.  सिमरन कौर असे या मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे तिच्या सोबत लहान मुलगा देखील होता. हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओही समोर आला आहे.

50 सेकंदाच्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, महिला आपल्या लहान मुलाला घेऊन रस्त्याने चालत आहे. त्यादरम्यान दोन गुंड येऊन तिच्या गळ्यातील साखळी ओढण्याचा प्रयत्न करतात. महिला विरोध करताना झालेल्या झटापटीत मुलगा खाली पडतो. त्यानंतर गुंड महिलेवर चाकूने हल्ला करतात. (Pune: सोसायटीच्या रस्त्यावर शतपावली करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले)

ANI Tweet:

पहा व्हिडिओ:

या प्रसंगाने आजूबाजूचे लोक घटनास्थळी धाव घेतात. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात येते. मात्र तिथे महिलेला मृत घोषित करण्यात येते. दरम्यान, दिल्ली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यासाठी 10 टीम्स तयार करण्यात आल्याची माहिती डीसीपी उषा रंगनाणी यांनी दिली आहे.