Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

इंटरनेट सर्फिंगसाठी गुगल क्रोमचा (Google Chrome) वापर सर्वाधिक केला जातो. अशा वेळी आपण आपले अनेक वैयक्तिक डॉक्युमेंट्स यावर ओपन करतो. मात्र अनेकदा या गुगल क्रोम एक्सटेंशनमुळे (Google Chrome Extension) हॅकर्सकडून (Hackers) तुमचा गुगल क्रोमवरील डेटा चोरण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यासाठी तुम्ही आवश्यक त्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी युजर्सने गुगल क्रोमवरील 'Sync' फिचरचा वापर करू शकता. रिसर्चर नुसार, क्रोम एक्सटेंशन वायरसने प्रभावित ब्राइजरच्या Sync फिचरच्या माध्यमातून हॅकर्स युजरच्या स्टोर केलेल्या पासवर्डला एक्सेस करुन सायबर क्राईम करु शकता.

गुगल क्रोम एक्सटेंशन हॅकर्सद्वारे हॅक होऊ नये म्हणून काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी ताबडतोब करा. हेदेखील वाचा- सावधान! QR Code स्कॅन करुन पेमेंट करत असाल, तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान

1. Google Chrome च्या सेटिंग्समध्ये जाऊन एक्सटेंशन तपासा

2. कोणतही अनोळखी एक्सटेंशन तुम्हाला दिसत असेल तर त्याला ताबडतोब रिमूव्ह करा.

3. त्यानंतर आपल्या वेब ब्राउजरला Google Chrome च्या लेटेस्ट पॅच अपडेट करा.

गुगल ने काही दिवसांपूर्वी Chrome ब्राउजरसाठी प्रायव्हसी सिक्युरिटी पॅच रोल आऊट केला आहे. या पॅचद्वारे क्रोम ब्राउजरमध्ये स्टोर केले गेलेले कमकुवत पासवर्ड चेक केले जाऊ शकतात. त्यामुळे युजर्सने त्वरित आपले पासवर्ड बदलून एक चांगला आणि सशक्त पासवर्ड ठेवावा. ज्यामुळे तुमचा सायबर क्राईमपासून बचाव होऊ शकतो.

सध्याच्या वेगवान टेक्नोलॉजीसह सायबर क्राईमचा धोका देखील वाढत चालला आहे. अशामध्ये आपल्या ईमेल आयडी, सोशल मिडियाशी संबंधित सर्व अकाउंट्सला प्रायव्हसी असणे गरजेचे आहे. हाच धोका लक्षात घेता गुगलने आपले क्रोम ब्राउजरमध्येही नवे अपडेट आणले आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये (Google Chrome) पासवर्ड प्रोटेक्शन (Password Protection) जोडता येणार आहे. आपल्या यूजर्सच्या खाजगी डिटेल्स संबंधित कुठलीही छेडछाड होऊ नये यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे. यासाठी गुगल क्रोमने आपले लेटेस्ट व्हर्जन v88 रोल आऊट केला आहे.