QR Code Scan (Photo Credits: PixaBay)

बदलत्या जगाबरोबर स्वत:ला बदलण्यासाठी लोक डिजिटल सेवांचा (Digital Service) वापर अधिकाधिक करु लागले आहेत. यामुळे ऑनलाईन पेमेंट (Online Payment) हा पर्याय अनेक लोक वापरू लागले आहेत. लोकांना स्वत: जवळ पैसे बाळगण्यापेक्षा अशा पद्धतीने पेमेंट करणे जास्त सोयीचे वाटते. मात्र अनेकदा आपल्याला जर एखाद्याचा नंबर सेव्ह करायचा नसेल किंवा त्याचा नंबर नसेल तर QR Code पद्धतीने आपण पेमेंट करतो. ज्यामुळे QR कोड स्कॅन करुन तुम्ही एकमेकांना पेमेंट करु शकता. मात्र यातही खूप खबरदारी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.

आजकाल सर्व फेरीवाले, भाजीवाले, दुकानदार सुद्धा डिजिटलाइज्ड झाले आहे. ज्यामध्ये हे लोक QR Code चा स्टिकर ठेवून ग्राहकांकडून खरेदीवर पैसे घेतात. मात्र यात काही ठराविक गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे अन्यथा मोठा फ्रॉड होऊ शकतो.हेदेखील वाचा- पेन ड्राइव्हला एखाद्या सॉफ्टवेअर शिवाय 'या' पद्धतीने लावता येईल पासवर्ड, जाणून घ्या अधिक

QR Code Fishing:

ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल देवाण घेवाण करीत असतात. त्यावेळी अनेक जण फ्रॉड करण्यासाठी तयार झालेले असतात. कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना अनेक जण स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करीत असतात. फ्रॉडस्टर त्यावेळी याचा गैरफायदा घेत असतात. क्यूआर कोडला बदल करीत असतात. ज्यामुळे पेमेंट फ्रॉडस्टरच्या अकाउंटला जाते. यावेळी क्यूआर कोड बदलून तसेच क्यूआर कोड टाकल्यानंतर क्यूआर कोड फिशिंग केले जाते. यामुळे अशावेळी पैसे दुकानदाराच्या खात्यात न जाता फ्रॉडस्टरच्या अकाउंटमध्ये जाते.

क्युआर कोड फिशिंग करणारे स्कॅमेर तुम्हाला मेसेज किंवा ईमेल द्वारे क्यूआर कोड सेंड करीत असतात. ज्यात तुम्हाला लॉटरी लागली असल्याची खोटी माहिती सांगितली जाते. ज्यात तुमचा यूपीआय पिन देऊन पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये घेतले जातात. ज्यावेळी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करीत असतात त्यावेळी यूपीआय पिन मागितला जातो. तुम्हाला वाटेल की, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. परंतु, यूपीआय पिन देताच तुमचे पैसे स्कॅमर अकाउंट मध्ये जातात. तसेच पेट्रोल पंप किंवा दुकानदारकडे तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देत असतात त्यावेळी क्यूआर कोड बदलण्याची शक्यता असते. क्यूआर कोड स्कॅन करताना पेमेंट स्कॅमर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करीत असतात.

हा खूपच भयानक प्रकार असल्यामुळे QR Code द्वारे पैसे ट्रान्सफर करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पैसे स्कॅमर द्वारे त्याच्या अकाउंटला जाण्याची शक्यता असते.