पेन ड्राइव्हला एखाद्या सॉफ्टवेअर शिवाय 'या' पद्धतीने लावता येईल पासवर्ड, जाणून घ्या अधिक
Pen Drive (Photo Credits-Twitter)

जर तुम्हाला एखादी फाइल सेव्ह केल्यानंतर ती समोरच्या व्यक्तीला शेअर करण्यापूर्वी तुम्ही त्याला पासवर्ड लावू शकता. याच दरम्यान आम्ही तुम्हाला पेन ड्राइव्हला (Pen drive)  कशा पद्धतीने पासवर्ड लावता येईल याबद्दल सांगणार आहोत. युएसबी पेन ड्राइव्हच्या सिक्युरिटीसाठी पासवर्ड लावण्यासंदर्भात सोप्पी ट्रिक सांगणार आहोत. हे फिचर विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये डिफॉल्टच्या रुपात तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.(World's Most Valued IT Company: TCS बनली जगातील सर्वाधिक मूल्यवान आयटी कंपनी; Accenture ला टाकले मागे)

सर्वात प्रथम तुमच्या कंप्युटरला पेन ड्राइव्ह लावा. त्यानंतर ड्राइव्हवर डाव्या बाजूला क्लिक करा. आता Turn On BitLocker चा ऑप्शन निवडा. असे केल्यानंतर 'युज पासवर्ड टू प्रोटेक्ट द ड्राइव्ह'वर क्लिक करा. यानंतर असा पासवर्ड निवडा जो तुमच्या लक्षात राहिल. हा पासवर्ड दोन्ही फिल्डमध्ये सेट करा. जो पर्यंत Save the key for future reference असे दिसून येत नाही तो पर्यंत Next बटणावर क्लिक करत रहा.(तुमच्या स्मार्टफोनमध्ये Fake App आहेत? 'या' पद्धतीने तपासून पहा)

आता एन्क्रिप्शन प्रोसेस ऑटोमॅटिकली सुरु होईल. त्यानंतर तुमच्याकडून सेट केलेल्या पासवर्डमुळे पेन ड्राइव्ह सुरक्षित होईल. जर तुम्हाला पासवर्ड विसरण्याची समस्या असल्यास एखाद्या ठिकाणी तो लिहून ठेवावा. त्यामुळे पुढील वेळेस तुम्हाला तो पासवर्ड पुन्हा एकदा वापरता येईल.