Flipkart वर 21-23 डिसेंबर दरम्यान Year End Sale, ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर मिळणार धमाकेदार सूट
Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

ई-कॉमर्स वेबसाईट्समधील फ्लिपकार्ट वर येत्या 21 ते 23 डिसेंबर दरम्यान ईअर एन्ड सेल सुरु होणार आहे. या सेल दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर धमाकेदार सूट देण्यात येणार आहे. तर कंपनीने असा दावा केला आहे की, 2019 मधील फ्लिपकार्टचा हा बेस्ट ऑफर असणारा सेल ठरणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी जर ICICI बँकेच्या क्रेडिड कार्ड मधून पैसे भरल्यास त्यांना 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. ही सूट EMI वर सुद्धा लागू केली जाणार आहे.

सॅमसंगच्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये सॅमसंग S9 स्मार्टफोनचा 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणारा 27,999 रुपयांना मिळणार आहे. मात्र या स्मार्टफोनची मूळ किंमत 62,500 रुपये आहे. 18,900 रुपयांचा सॅमसंग A30S स्मार्टफोन 15,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच सॅमसंग A50 स्मार्टफोन 14,999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

त्याचसोबत Oppo कंपनीचे स्मार्टफोनवर सुद्धा धमाकेदार सूट मिळणार आहे. यामध्ये ओप्पो F11 Pro चा 6जीबी आणि 128 जीबी असणारा स्मार्टफोन 16,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 29,990 रुपये आहे. तसेच ओप्पो A7 चा 4जीबी आणि 64 जीबी असणारा स्मार्टफोन 9,900 रुपयांना सूट सोबत मिळणार आहे.(Jio Fiber Set-Top Box: 'असा' मिळवा मोफत जिओ फायबरचा सेट-टॉप बॉक्स)

 त्याचसोबत फ्लिपकार्टच्या सेलमध्ये गुगल, असुस, नोकिया या सारख्या स्मार्टफोनवर सुद्धा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टवर या सेलमध्ये नुकतेच बाजारात लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर दमदार सूट दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या शिखाला परवडतील अशा किंमतीत हे स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार  आहेत. त्याचसोबत  नो कॉस्ट एमआय आणि ऐक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात आली आहे.