Jio Fiber Set-Top Box: 'असा' मिळवा मोफत जिओ फायबरचा सेट-टॉप बॉक्स
Jio Fiber Set-Top Box (PC- Twitter)

जिओ फायबरने 2 महिन्यांपूर्वी एक टॅरिफ प्लान लाँच केला होता. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी पेड प्लान सुरू केला आहे. या प्लानमध्ये ब्रॉडबँड सर्व्हिसच्या ग्राहकांना मोफत सेट-टॉप बॉक्स देण्यात येणार आहे. सध्या जिओ फायबर सेट-टॉप बॉक्सद्वारे काही अॅप तसेच इतर सेवांचे प्रक्षेपण केले जाते. जिओ फायबर सेट-टॉप बॉक्सच्या प्रक्षेपणासाठी इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक असतं. हा सेट-टॉप बॉक्स अँड्रॉईड 7.0 वर आधारित आहे. ग्राहकांना मोफत सेट-टॉप बॉक्ससाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहे.

'जिओ फायबर वेलकम प्लान'मध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी जिओ फायबर सेवा घेणाऱ्यांना मोफत 4K LED टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स देण्यात येतो. ही एक ब्रॉडबॅण्ड सेवा. यामध्ये फायबर टू द होम (FTTH) च्या माध्यमातून थेट घरापर्यंत फायबर कनेक्शन देण्यात येते. आतापर्यंतच्या इतर ब्रॉडबॅण्ड सेवांमध्ये फायबर कनेक्शन घरापर्यंत आणलं जातं. त्यानंतर तिथून घरापर्यंत केबलने कनेक्टिविटी पोहोचवली जाते. मात्र, जिओ फायबरच्या माध्यमातून थेट घरापर्यंत जास्त स्पीडचे इंटरनेट कनेक्शन मिळते. (हेही वाचा - Reliance JioFiber युजर्सला झटका, 90 टक्क्यांपर्यंत इंटरनेटच्या स्पीडमध्ये घट)

'असा' मिळवा मोफत सेट-टॉप बॉक्स -

  • जिओ फायबरचा सेट अप टॉप बॉक्स मिळवण्यासाठी MyJio app द्वारे तुमच्या आवडीचा पेड प्लान निवडण्यासाठी साइन-अप करा. यामध्ये तुम्ही 1 महिना, 3 महिने आणि वर्षभरासाठीचाही प्लान निवडू शकता.
  • तुम्ही प्लान निवडून पेमेंट केल्यानंतर MyJio app च्या स्क्रीनवर तुम्हाला एक बॅनर दिसेल. यात तुम्हाला सेट-टॉप बॉक्स इंस्टॉल करण्यासाठी वेळ घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही जवळच्या रिलायन्स जिओ स्टोअरमधूनही मोफत सेट-टॉप बॉक्स घेऊ शकता.

'असा' करा सेट-टॉप बॉक्स इंस्टॉल -

रिलायन्स जिओकडून सेट-टॉप बॉक्स इंस्टॉलेशनसाठी एक टेक्निशियन पाठवण्यात येईल. यासाठी तुम्हाला MyJio app मधून व्हाऊचर क्लेम करावा लागेल. या प्रक्रियेसाठी तुम्हाला 10 मिनिटे लागतील. त्यानंतर सेट-टॉप बॉक्स टीव्हीशी जोडला जाईल. तुम्ही पहिल्यांदाच सेट टॉप बॉक्स जोडला असेल तर सुरुवातीला काही अपडेट्स इंस्टॉल होतील. त्यानंतर तो रीबूट होईल. तसेच रिमोट कंट्रोललाही नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळतील.

Jio Fiber सेट-टॉप बॉक्स या अॅपमध्ये उपलब्ध आहे -

जिओच्या या सेट-टॉप बॉक्समध्ये हॉटस्टार, यूट्यूब, वूट, जिओ सावन, जिओ टीव्ही प्लस, सोनी लिव्ह आणि जिओ सिनेमा यांचा समावेश आहे. यातून तुम्ही नवीन अॅप तसेच गेम्स डाऊनलोड करू शकता. यावर तुम्हाला निवडलेल्या प्लाननुसार सेवा मिळतील.