टेलिकॉम सेक्टर प्रमाणाचे ब्रॉडबॅन्ड सेक्टर मध्ये ही स्पर्धा वाढली आहे. याचा परिणाम कंपन्यांवर होत त्यांच्या काही कामांबाबत बदल झाल्याचे दिसून येत आहे. तर रिलायन्स जिओफायबर यांनी याची सुरुवात केली आहे. टेलिकॉम टॉक यांच्या रिपोर्टनुसार, जिओफायबर याच्यासोबत मिळाणाऱ्या इंटरनेट सेवेच्या स्पीडमध्ये 90 टक्क्यांपर्यंत घट केली आहे. याबाबत ट्वीटरवरुन युजर्सने कंपनीने जिओफायबरसाठी देण्यात आलेली स्पीड कमी केल्याचे म्हटले आहे.
ट्वीटरवर युजरने असे लिहिले आहे की, जिओफायबर सोबत मिळणारी मुळ स्पीड कमी केली असून ती आता फक्च 10 टक्केच राहिली आहे. सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास आता 100Mbps स्पीड असलेला प्लॅन युजर्सने खरेदी केल्यास त्याला फक्त 10Mbps स्पीड देण्यात येणार आहे. ज्यावेळी एखादा इंटरनेट प्रोवाडर युजर्सचा ही सेवा देऊ करत असेल त्यावेळी डाऊनलोड आणि अपलोड करण्याचा स्पीड एकच असतो. मात्र आता जिओफायबरने त्यांच्या स्पीडमध्ये कपात केल्याने त्याचा फटका युजर्सला होणार आहे.
रिलायन्स जिओफायबर सुविधेच्या माध्यमातून दिवसांपूर्वीच युजर्सकडून पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नव्या युजर्ससह ज्यांनी कंपनीच्या प्रिव्हू ऑफर अंतर्गत जिओफायबर सुविधेचा लाभ फ्री मध्ये घेत आहेत. फ्री सर्विस देण्याच्या कारणामुळे कंपनीने बिलिंगमध्ये याचे रुपांतर होणार नसल्याचे यापूर्वी म्हटले होते. मात्र आता युजर्सला जिओफायबर सर्विससाठी पैसे मोजावे लागणार आहेत.('जिओ'च्या कॉल, डाटा प्लॅनच्या टेरिफ मध्ये वाढीसोबतच आता JioFiber साठीदेखील मोजावे लागणार पैसे)
तर जिओ फायबर सेवा खरेदी केलेल्या ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडण्यास सांगण्यात आले आहे. तसे न केल्यास भविष्यात त्यांची सेवा खंडीत केली जाणार आहे. येत्या काही आठवड्यात देशभरात रिलायंस जिओ फायबरसाठी कमर्शिअल बिलिंग सेवा सुरू केली जाईल. सध्या देशातील सुमारे 5 लाख जिओ फायबर युजर्सना टॅरिफ प्लॅन मध्ये शिफ्ट केले जाणार आहे. तसेच ट्रायल सेवा वापरणार्यांनादेखील मोफत सेवा देण्याऐवजी टॅरिफ प्लॅन्स दिले जातील. असे इकोनॉमिक्स टाईम्समध्ये सांगण्यात आले आहे