'जिओ'च्या कॉल, डाटा प्लॅनच्या टेरिफ मध्ये वाढीसोबतच आता JioFiber साठीदेखील मोजावे लागणार पैसे
Reliance Jio Fiber Broadband | (Photo credit: Archived, edited, symbolic image)

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये तीव्र होत चाललेल्या स्पर्धेमधून आज (3 डिसेंबर) पासून देशभरात प्रीप्रेडचे दर वाढले आहेत. सध्या व्होडाफोन आणि आयडियाचे दर वाढले आहेत तर येत्या 6 डिसेंबरपासून जिओचे देखील दर वाढणार आहेत. रिलायंस जिओने रविवारी टेरिफ प्लॅनमध्ये दरवाढीची घोषणा केल्यानंतर आता रिलायंस जिओ फायबरच्या दरामध्येही वाढ केली आहे. जिओच्या युजर्सना आता 'फ्री ब्रॉडबॅंड'ची सेवा मिळणार नाही. या सेवेसाठीदेखील आता पैसे मोजावे लागणार आहेत. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या प्रिपेड ग्राहकांना दरवाढीचा फटका; 3 डिसेंबर पासून लागू होणार नवे दर.

 जिओ फायबर सेवा खरेदी केलेल्या ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडण्यास सांगण्यात आले आहे. तसे न केल्यास भविष्यात त्यांची सेवा खंडीत केली जाणार आहे. येत्या काही आठवड्यात देशभरात रिलायंस जिओ फायबरसाठी कमर्शिअल बिलिंग सेवा सुरू केली जाईल. सध्या देशातील सुमारे 5 लाख जिओ फायबर युजर्सना टॅरिफ प्लॅन मध्ये शिफ्ट केले जाणार आहे. तसेच ट्रायल सेवा वापरणार्‍यांनादेखील मोफत सेवा देण्याऐवजी टॅरिफ प्लॅन्स दिले जातील. असे इकोनॉमिक्स टाईम्समध्ये सांगण्यात आले आहे. Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, कंपनीने वाढवल्या Plans च्या किंमती; 6 डिसेंबरपासून नवे दर लागू.

रिलायन्स जिओ फायबर ब्रॉडबॅन्डमध्ये किमान 699 ते 8499 रूपये याधील प्लॅन्स बनवण्यात आले आहेत. तर स्पीड किमान 100Mbps ते 1Gbps आहे. जिओ फायबर ( Jio Fiber Broadband) ही ब्रॉडबँड सेवा 5 सप्टेंबर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिओ फायबर ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा आहे.