Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या प्रिपेड ग्राहकांना दरवाढीचा फटका; 3 डिसेंबर पासून लागू होणार नवे दर
Reliance Jio, Airtel & Vodafone Idea Tariff Increased (File Photo)

सध्या तोट्यात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांनी भारतातील प्रिपेड धारकांना आता मोठा दरवाढीचा मोठा धक्का दिला आहे. दरम्यान एअरटेल, जिओ, व्होडाफोन त्यांच्या प्रिपेड टेरिफ प्लॅन्समध्ये किमान 15-40% वाढ करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच मोबाईल ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3 डिसेंबर पासून ग्राहकांना नवे दर आकारण्यात येणार आहेत त्यामुळे आता ग्राहकांना दुपट्टीहून अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचं चित्र आहे.

रविवार (1 डिसेंबर) दिवशी Vodafone Idea, Bharti Airtel आणि Relience Jio कडून दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.

व्होडाफोन आयडिया प्लॅन्स नवे दर

रविवारी व्होडाफोन आयडिया कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डाटा आणि कॉल चार्जेस मध्ये सुमारे 42% वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ 3 डिसेंबरपासून लागू असेल. तसेच व्होडाफोन आयडिया आता इतर ऑपरेटर्ससाठी आऊटगोईंग कॉलसाठी 6 पैसे पर मिनीट असे आकारले जाणार आहेत. अनलिमिटेड कॅटेगरीमध्ये आता 2 दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवस अशा व्हॅलिडीटीमध्ये आहेत. या नव्या प्लॅन्समध्ये सुमारे 41% वाढ झाली आहे. अनलिमिटेड डाटा आणि मोबाईल सर्व्हिसमध्येही वाढ करण्यात आली आहे. वार्षिक अनलिमिटेड 1699 चा प्लॅन आता 2399 रूपये होणार आहे.

भारती एअरटेल  प्लॅन्स नवे दर

भारती एअरटेलने जाहीर केलेल्या नव्या प्लॅननुसार आता 3 डिसेंबर पासून ग्राहकांना सुमारे 42% अधिक दर मोजावे लागणार आहेत. व्होडाफोन आयडीयाच्या तुलनेत भारती एअरटेलचे दर थोडे स्वस्त आहेत. भारती एअरटेलच्या नव्या दरानुसार प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. नवीन प्लॅन्सच्या अनलिमिटेड कॅटेगरीमध्ये 2 दिवस, 28 दिवस, 84 दिवस ते 365 दिवस व्हॅलिडीटी आहे. यामध्ये 41.14% इतकी सर्वाधिक दरवाढ आहे. व्होडाफोन प्रमाणेच भारती एअरटेलच्या ग्राहकांना 3 डिसेंबरपासून महिनाभर कनेक्टेड राहण्यासाठी किमान 49 रूपये मोजावे लागणार आहेत.

रिलायंस जिओ प्लॅन्स नवे दर

रिलायंस जिओच्या प्लॅन्सनुसार, अनलिमिटेड प्लॅन्स आता 6 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये व्हॉईस आणि डेटा टॅरिफ प्लॅन्स सुमारे 40% नी वाढणार आहेत. रिलायंस जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहकांना 300% अधिक फायदा होणार आहेत. Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, कंपनीने वाढवल्या Plans च्या किंमती; 6 डिसेंबरपासून नवे दर लागू.

2016 नंतर प्रथमच भारतामध्ये प्रथमच टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढीची इतकी मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.