Flipkart Offers On Samsung Phone: फ्लिपकार्टची बंपर ऑफर, Samsung चे हे मोबाईल घ्या फक्त 15 हजारात
Samsung F14 (PC - samsung.com)

Flipkart Offers On Samsung Phone: दिवाळीच्या सणासुदीला मोबाईल घेण्याची इच्छा तर होतेच. पण काही वेळा खिशाला दिवाळीमुळे आधीच कात्री लागलेली असते. त्यामुळे महागडे फोन घ्यायचा विचार सुध्दा येत नाही. यंदा तुम्हाला महागडा फोन स्वस्तात घेता येईल. फ्लिपकार्डने अगदी बजेटमध्ये फोन तुमच्यासाठी खास ऑफरला काढले आहे. ही संधी तुम्ही चुकवूच नका. दिवाळीची धमाकेदार ऑफर, फ्लिपकार्टवर सुरु असलेले Samsung मोबाईलवरचे हे नक्की पाहा. अगदी 10 हजार ते 15 हजारांपर्यंत हे मोबाईल ऑफरमुळे घेऊ शकता.  Samsung Galaxy F14 5G,सॅमसंग गॅलेक्सी M14 5G, सॅमसंग गॅलेक्सी F13, सॅमसंग गॅलेक्सी A14  या फोनवर ऑफस सुरु आहे त्यामुळे ऑफरची संधी चुकवू नका.

सॅमसंग गॅलेक्सी F14 5G - या फोनची मुळ किंतम 18 हजारच्या दरात आहे. फ्लिपकार्डच्या सेलमुळे 32 टक्के डिस्काउंटसह हा फोन फक्त 12,490 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. फोनमध्ये  6 GB रॅम असून 128 GB ROM स्टोरेज उपलब्ध आहे. फोटो आणि व्हिडिओसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो.

सॅमसंग गॅलेक्सी M14 5G या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. या फोनची खरी किंमत ही 18,990रुपये आहे. पंरुतु फ्लिपकार्डच्या ऑफर सेलमुळे 13,114रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर ३० टक्के सूट मिळेल. या फोनवर नो कॉस्ट EMI  पर्याय देखील मिळत आहे. 12 GB रॅम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F13 या फोनमध्ये  फोटो आणि व्हिडिओसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ऑफरमध्ये हा फोन 10,199 पर्यंत मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओसाठी 8 मोगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. सोबत फोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी मिळते.

सॅमसंग गॅलेक्सी A14 या फोनची किंमत 18,499 पर्यंत आहे. दिवाळी ऑफर मध्ये हा फोन 14,999 रुपयांना मिळत आहे. शिवाय या फोनच्या खरेदी वेळीस योग्य ती बॅंक ऑफर मिळवा. 5000 mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले आहे.

-