WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. केवळ मेसेज पुरता हे मर्यादीत न राहता आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार, व्हिडिओ चॅटिंग करण्याची सोय उपलब्ध आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 1.5 बिलियन तर अवघ्या भारत देशामध्ये 400 मिलियन युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजर्ससाठी वारंवार काही अपडेट्स आणत असतात. आता यामध्ये युजर्सची Privacy and Control of Spam साठीदेखील अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लवकरच आयफोन आणि अ‍ॅन्ड्रॉईड युजर्ससाठी डार्क मोडचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. iOS 13 आणि Android Q update मध्ये तो लवकरच उपलब्ध होईल. पण त्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर नुकतेच रोल आऊट झालेले हे काही पर्याय नक्की आजमावून बघा

फिंगरप्रिंटच्या मदतीने मेसेज अनलॉक

अ‍ॅन्ड्रॉईड युजर्स साठी आता व्हॉट्सअ‍ॅपने फिंगरप्रिंट अनलॉक देण्यात आलं आहे. प्रायव्हसी सेक्शनमध्ये हा पर्याय आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप फिंगरप्रिंटच्या मदतीने मेसेज ओपन करण्यासाठी परवानगी देणार आहे. iOS, iPhone, iPad युजर्स Face ID / Touch ID च्या मदतीने करू शकतात.

फ्रिक्वेंटली फॉर्वर्ड (Frequently Forwarded)

व्हॉट्सअ‍ॅपवर Frequently forwarded मेसेज आता खास टिकच्या माध्यमातून दाखवले जातात. पाच पेक्षा जास्त वेळेस फॉरवर्ड केलेले मेसेज तुम्हांला पाठवला असेल तर त्या मेसेजच्या बाजुला अ‍ॅरो दाखवला जातो.

Consecutive Voice Messages

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस मेसेज पाठवणार्‍यांनाही खास फीचर देण्यात आलं आहे. यामध्ये खूप सार्‍या क्लिप्स एकत्र पाठवल्या जातात आणि एकापाठोपाठ एक त्या क्लिप प्ले केल्या जातात. प्रत्येक क्लिप वेगळी जाऊन प्ले करण्याची गरज नाही.

Group Invitation

Group invitation या फीचरच्या मदतीने आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये केवळ त्यांच्या कॉन्टक्ट लिस्ट मधील व्यक्ती अ‍ॅड करू शकतील. आता एका आमंत्रणाच्या द्वारा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये व्यक्तीला 72 तासाची अ‍ॅक्टिव्हेशन लिंक दिली जाते.

दरम्यान पुढील काही दिवसातच व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा आणण्याच्या प्रयत्नात आहे. व्हाट्सअ‍ॅप पे च्या माध्यमातून पैसे पाठवणे, बिल भरणे, रिचार्ज करणे आणि सोबतच चॅटही करणं असं सगळं एकाच अ‍ॅपमध्ये आल्यावर यूजर्सना वेगवेगळ्या अ‍ॅपची गरज उरणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती.