सोशल मीडियावरील प्रसिद्ध अॅप व्हॉट्सअॅप त्यांच्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी बदलत्या ट्रेन्डनुसार फिचर्समध्ये बदल केले जातात. व्हॉट्सअॅमध्ये आता एक नवे फिचर आले असून फिंगप्रिंटच्या सहाय्याने मेसेज अनलॉक करता येणार आहे. व्हॉट्सअॅप अपडेटच्या 2.19.3 व्हर्जनमध्ये हे फिचर युजर्सा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र आयफोन युजर्ससाठी हे फिचर्स तीन महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आले आहे.
WABetaInfo ने याबद्दल माहिती दिली असून आता व्हॉट्सअॅप युजर्सला फिंगरप्रिंट हे फिचर वापरता येणार आहे. मात्र ज्या स्मार्टफोनसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे त्याच स्मार्टफोनसाठी हे फिचर्स उपलब्ध करुन दिले आहे. फिंगरप्रिंटचे फिचर वापरण्यासाठी युजर्सला प्रथम सेटिंगमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' असा एक ऑप्शन दिला जाणार आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बीटा युजर्सच्या समोर एक स्क्रिन आल्यानंतर रजिस्टर्ड फिंगरप्रिंट व्हेरिफाय करावे लागणार आहे.(WhatsApp मध्ये लवकरच Boomerang फिचर येणार)
व्हॉट्सअॅपचे नवे फिचर्स आणि अपडेट अॅन्ड्रॉइड बीटा युजर्सला प्रथम उपलब्ध करुन देण्यात येतात. मात्र पहिल्यांदाच कंपनीने व्हॉट्सअॅपचे हे फिचर्स प्रथम आयफोन युजर्सला उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच लवकरच व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड आणि आयफोनसाठी फेस आयडी ऑथेंटिकेशन फिचर घेऊन येणार आहे.