फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या प्रख्यात सोशल नेटवर्किंग साइट्सच्या सुरक्षेवर मागील काही दिवसात अनेक प्रश्न उभे राहिले होते, मात्र आमच्या युजर्सचा विश्वास हेच ध्येय आहे असे म्हणत फेसबुकचे सीईओ (Facebook CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zukerberg) याने नुकत्याच झालेल्या F8 परिषदेत या सोशल साइट्सच्या सिस्टीम मध्ये नवे बदल करणार असल्याची माहिती दिली.
फेसबूकने काही दिवसांआधी मेसेंजर या ऍपच्या रचनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ही नवीन बांधणी अधिक जलद व वापरण्यास सोप्पी असेल. तसेच येत्या वर्षात वापरण्यासाठी उपलब्ध केली जाईल अशी माहिती मेसेंजरच्या डायरेक्टर, आशा शर्मा यांनी दिली. फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक
फेसबुक तर्फे आणले जाणारे काही मुख्य बदल जाणून घेऊयात...
- यापुढे युजर्सना ऑनलाईन व्हिडिओज शोधता आणि पाहता येतील, तसेच हे व्हिडीओ थेट मेसेंजर वरूनच शेअर करून इतरांना पाहण्यासाठी बोलवता येईल.हे सगळे करत असताना तुम्ही एकाच वेळी मेसेज किंवा व्हिडीओ कॉल देखील करू शकता.
- मेसेंजरच्या माध्यमातून आता फेसबुक,व्हॉट्सऍप यावर देखील थेट मेसेज करता येणार आहे.
- मेसेंजर हे अप्लिकेशन आता कॉम्प्युटर वर देखील वापरता येईल, लवकरच विंडोज (Windows) आणि MacOS च्या सिस्टीमवर डाउनलोड करता येणार आहे. या ऍप वर ग्रुप व्हिडीओ कॉलची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
- मेसेंजर वर देखील आता इंस्टाग्राम प्रमाणे स्टोरीज शेअर करता येणार आहेत.
- येत्या काहीच महिन्यात व्हाट्सऍप च्या अंतर्गत चॅट करत असताना नवीन बिजनेस कॅटलॉग पाहायला मिळणार आहे, या कॅटलॉगच्या माध्यमातून व्यापाराला चालना मिळेल अशी माहिती व्हाट्सऍप च्या प्रोडक्ट मॅनेजमेंट विभागाच्या उपाध्यक्ष अमी वोरा यांनी दिली. 10 Years Of WhatsApp: मागील दहा वर्षात व्हॉट्सअॅपमध्ये झाले हे '9' मोठे बदल (Watch Video)
- फेसबुकला गती येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'FB5' ही नवीन प्रणाली देखील या दरम्यान उघड करण्यात आली.
- फेसबुकमध्ये नवीन कॅमेरा डिजाईन अंतर्गत क्रिएट पर्याय देण्यात येईल ज्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ न काढता आपण मित्रांसोबत संवाद साधू शकता.
- इंस्टाग्राम वर उपलब्ध असणाऱ्या शॉपिंग साईट्सवर थेट क्लिक करून ते उत्पादन विकत घेता येईल यामुळे ऑनलाईन खरेदीला चालना मिळणार आहे असे सांगण्यात येतेय. सुरवातीला याची चाचणी काही छोट्या ग्रुप्ससोबत करून मग पूर्ण वापरासाठी हे फीचर लाँच केले जाणार आहे.
फेसबुक हा जवळपास 400 मिलियन लोकांना जोडणारा एक सोशल साइट्सच्या स्वरूपातील दुवा आहे. या सर्व युजर्सच्या सोयीसाठी हे नवे बदल आणले जाणार आहेत. यातील काही बदल हे तात्काळ बघायला मिळतील तर बिजनेस व कॉम्प्युटर अप्लिकेशनचा पर्याय येत्या वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.