फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक

फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड (Amazon cloud) कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सायबर स्पेस कंपनी अपगार्डने याबाबत वृत्त दिले आहे

फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक
Facebook (Photo Credit: Pixabay)

काही दिवसांपूर्वी फेसबुक (Facebook) च्याच कर्मचाऱ्यांकडून युजर्सचे पासवर्ड लीक झाल्याचा प्रकार घडला होता. आता फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड (Amazon cloud) कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सायबर स्पेस कंपनी अपगार्डने याबाबत वृत्त दिले आहे. फेसबुकसाठी अन्य दोन कंपन्या काम करीत आहेत, त्यांनी युजरचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोअर केला आहे. मात्र हा डेटा इतर कोणीही सहज प्राप्त करू शकते. यामध्ये एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे.

याबाबत फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फेसबुकचा डेटा असा कोठेही स्टोअर केला जाऊ शकत नाही. ही माहिती मिळाल्यावर तात्काळ अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधून हा डेटा तिथून हटवला गेला आहे.’ दरम्यान फेसबुक कंपनी इतर कंपन्यांना (थर्ड पार्टी) एखादे अ‍ॅप किंवा वेबसाइटवर आपल्या माध्यमातून साइन इन करण्याची परवानगी देते. त्यामुळे युजर्सना डेटा सुरक्षित राहिलच याबाबत कोणतीही हमी फेसबुक देऊ शकत नाही. (हेही वाचा: फेसबुकनंतर आता इंन्स्टाग्रामवरील युजर्सचा डेटा धोक्यात)

गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुकच्या डेटा चोरी होत असल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. डेटा लीक प्रकरणी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याने अध्यक्षपद सोडावे म्हणून वारंवार दबावही आणला गेला होता. त्यात इंस्टाग्रामवरील (Instagram) चा डेटाही लीक झाल्याचा प्रकार घडला होता. इंन्स्टाग्रामच्या 'डेटा डाउनलोड टूल'मध्ये त्रुटी आढळल्याने युजरचा डेटा लीक झाला होता.

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2019 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).