फेसबुकनंतर आता इंन्स्टाग्रामवरील युजर्सचा डेटा धोक्यात
इंन्स्टाग्राम डेटा लीक ( फोटो सौजन्य - फेसबुक )

गेला काही दिवसांपासून फेसबुकचा (Facebook) डेटा चोरी होत असल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे डेटा लीक प्रकरणी मालक झकरबर्ग (Mark Zuckerberg)  याने अध्यक्षपद सोडावे म्हणून वारंवार दबाव आणला जात आहे. मात्र आता इंस्टाग्रामवरील (Instagram)  ही डेटा लीक झाल्याचा प्रकार घडला आहे.

फेसबुकवरील डेटा चोरी होत असल्याने त्यावरचा विश्वास नाहीसा होत असताना दिसून येत आहे. त्यामध्ये आता इंन्स्टाग्रामचासुद्धा डेटा चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या डेटा चोरी प्रकरणी 'द व्हर्ज' ने याचे स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणी युजर्सचे पासवर्ड उघडकी आली असून जास्त जणांची माहिती समोर आली आहे.

यामुळे कंपनीने इंन्स्टाग्रामच्या युजर्सना त्यांचे पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे. तर इंन्स्टाग्रामच्या 'डेटा डाउनलोड टूल'मध्ये त्रुटी आढळल्याने त्याद्वारे युजरचा डेटा लीक होत आहे.