प्रातिनिधिक प्रतिमा (File Photo)

WhatsApp 10 year Anniversary: भारतासोबतच जगभरामध्ये चॅटिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आजकाल आबलवृद्धांचं व्हॉट्सअ‍ॅपशिवाय पानदेखील हलत नाही. जगभरात सुमारे 1. 5 कोटी युजर्स आहेत. आज फेसबुकने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. आज व्हॉट्सअ‍ॅपला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मागील दहा वर्षांचा प्रवास त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवला आहे. या दहा वर्षांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपमध्ये झालेले बदल त्यांनी युजर्ससमोर ठेवले आहेत.

2009: दहा वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपची आयफोन आणि अ‍ॅन्ड्रॉईडपासून सुरूवात झाली. सुरूवातीला हे केवळ मेसेजिंग अ‍ॅप होतं. हळूहळू त्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याचं फीचर जोडण्यात आलं.

2010: व्हॉट्अ‍ॅपने लोकेशन शेअर करण्याचं फीचर दिलं.

2013: व्हॉट्सअ‍ॅपमधील सगळ्यात महत्त्वाचं फीचर म्हणजे ग्रुप बनवण्याची आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्याची सोय देण्यात आली.

2014: हे वर्ष व्हॉट्सअ‍ॅपसाठी खास होतं. यावर्षी व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स 50 कोटी पार गेले होते. ‘Read Receipts’हे फीचरदेखील यावर्षीच जोडण्यात आलं आहे.

2015: यावर्षी व्हॉट्सअ‍ॅपने डेस्कटॉप युजर्ससाठी खुलं करण्यात आलं.

2016: यावर्षी 100 कोटीचा टप्पा पार केला. प्रायव्हसी वाढवण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर देण्यात आलं. 2016 वर्षाखरेस व्हॉट्सअ‍ॅपने कॉलिंग फीचर दिलं.

2017: व्हॉट्सअ‍ॅपने स्टेट्स जोडण्याचं फीचर यामध्ये दिलं.

2018: आता व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर्सची संख्या 150 कोटीच्या पार गेली होती. युजर्सने केलेल्या मागणीनुसार यामध्ये WhatsApp Business app, ग्रुप कॉलिंग आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सची सोय देण्यात आली.

2019: आज व्हॉट्सअ‍ॅपने दहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे.

दिवसागणित टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल व्हॉट्सअ‍ॅपनेही स्वीकारले आहेत. युजर्सची मागणी पाहता त्यांना अधिक सुलभतेने वापर करता यावा या उद्देशाने बदल करत आहे.