फेसबुक (Facebook) युजर्सची संख्या जगभरामध्ये कोट्यवधीच्या संख्येत आहे. त्यातील काही युजर्स खरे काही खोटे असतात. काही चांगल्या भावनेने आलले काह वाईट भावनेने आलेले. काही फायदेशीर माहिती, मजकूर, व्हिडिओ अथवा इतर सामग्री शेअर करणारे तर काही दिशाभूल करणारे, धोकादायक, हानिकारक मजूकूर, सामग्री अपलोड करणारे. या सर्वांत युजर्स किंवा स्वत:लाही धोकादायक अथवा हानिकारक कंटेट फेसबुक कसा शोधतो. फेसबुकला (Facebook Content) त्याबाबत कसे कळते? असा कंटेट फेसबुक (Facebook Harmful Content कसा शोधतो हे प्रश्न नेहमीच अनेकांना पडतात.
'प्रोअॅक्टीव्ह डिटेक्शन'
धोकादायक आणि हानिकारक मजकूर शोधण्यासाठी फेसबुक विषयसामग्रीनुसार तीन टूल्सचा वापर करतो. जेणेकरुन इतर सर्व अॅपही आपल्या निरीक्षण प्रक्रियेसाठी लागू करु शकतील. या तीन टूल्सबाबत सांगायचे तर पहिल्याचे नाव आहे. 'प्रोअॅक्टीव्ह डिटेक्शन' यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) द्वारा कोणताही कंटेंट घेऊन यूजर्सच्या तक्रारीशिवायही विविध विषयांतील नियम, कायदे, अटी यांच्या उल्लंघनाबाबत पत्ता लागू शकतो. कंपीनीने एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आम्हाला हानिकारक सामग्रीबाबत माहिती मिळताच त्यावर तातडीने कारवाई करण्यात येते. त्यासाठी तातडीने ती सामग्री बंद करुन शेकडो हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्यापासून बंद केली जाते.
'ऑटोमेशन'
'ऑटोमेशन' हा एक फेसबुकचा दुसरा टूल्स आहे. यामध्ये कोणत्याही किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधून एआय स्वलंचलीत निर्णय होतात. इथे कंटेंट किंवा विषयसामग्री उल्लंघन होण्याची शक्यता अधिक असते. फेसबुकमध्ये इंटेग्रिटीचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट निर्देशक जेफ किंग यांनी म्हटले आहे की, ऑटोमेशन किंवा स्वयंचलनापूर्वी रिपोर्ट करण्यात आलेल्या विषयसामग्रीवर कारवाई करण्याचे काम सोपे होते. त्यामुळे आमच्या टीमला एकाच विषयाबाबत वारंवार तपासणी करावी लागत नाही. त्यामुळे आमचे काम बरेच कमी आणि सोपे होऊन जाते. कोरोना व्हाययरस संक्रमन काळात हे काम अधिक महत्त्वपूर्ण झाले आहे. (हेही वाचा, Google ‘People Cards’ Launched in India: गुगल सर्चमध्ये Public Profile बनवण्यासाठी पीपल कार्ड फिचर भारतात लॉन्च; कसे तयार कराल तुमचे पीपल कार्ड?)
प्राथमिकता
'प्राथमिकता' या टूल्समध्ये विषयसामग्री केवळ क्रमबद्ध पद्धतीने पाहिली जाते. त्याशिवाय एआय या विषयसामग्रीबाबत प्राथमिकता देते जी महत्त्वपूर्ण असते. मग ती सामग्री फेसबुक रिपोर्ट करण्यात आलेले असो अथवा आपल्या प्रोटेक्टिव सिस्टम द्वारा त्याची माहिती देण्यात आलेली असो.
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून इंटरनेटचाही वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सहाजिकच सोशल मीडया युजर्स आणि त्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. अशा वेळी आक्षेपार्ह मजकूर वगळणे, तो तपासणे त्यावर कारवाई करणे यांचे मोठेच आव्हान फेसबुकसमोर निर्माण झाले आहे.