Google ‘People Cards’ Launched in India: गुगल सर्चमध्ये Public Profile बनवण्यासाठी पीपल कार्ड फिचर भारतात लॉन्च; कसे तयार कराल तुमचे पीपल कार्ड?
Google People Cards Launched in India (Photo Credits: Google)

गुगलने (Google) भारतात पीपल कार्ड (People Card) हे नवे फिचर लॉन्च केले आहे. यामुळे युजर्संना गुगल सर्चवर पब्लिक प्रोफाईल (Public Profile) बनवता येणार आहे. या नव्या फिचरचे भारतात गेल्या काही वर्षांपासून टेस्टिंग सुरु होते. आता हे फिचर लॉन्च झाले असून यामुळे लोकांना ऑनलाईन सर्च (Online Search) करणे अधिक सोपे होणार आहे. People Card या नव्या फिचरमुळे युजर्संना डिजिटल व्हिजिटिंग कार्ड (Digital Visiting Card) मिळणार आहे. याद्वारे युजर्स आपली सोशल मीडिया प्रोफाईल, लोकेशन, वेबसाईट, फोन नंबर आणि ईमेल आयडी लोकांसोबत शेअर करु शकतील.

प्रत्येक युजरला गुगल सर्चवर आपली पब्लिक प्रोफाईल तयार करता यावी हा People Cards लॉन्च करण्यामागील उद्देश आहे. गुगलवर सर्च केल्यानंतर हे People Cards टॉप रिझल्टवर दिसेल. तसंच आवश्यक आणि विश्वसनीय माहिती युजर्संना मिळावी हा देखील People Cards लॉन्च करण्यामागील हेतू आहे. पीपल कार्डमध्ये काही चुकीचा कन्टेट आढळल्यास युजर्स त्या कार्डबद्दल रिपोर्ट करु शकतात. प्रत्येक व्यक्ती केवळ एकच People Card तयार करु शकते. फेक प्रोफाईल्संना आळा घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Google India Tweet:

People Card कसे तयार कराल?

सर्वप्रथम गुगल अकाऊंटवर साईन इन करा आणि 'add me to search' असे सर्च करा. त्यानंतर 'Add yourself to Google Search' असा मेसेज तुमच्या स्क्रिनवर दिसेल.

Google People Cards (Photo Credits: Google)

त्या पॉप अप मेसेजवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर सहा अंकी युनिक कोडने व्हेरिफाय करण्यात येईल. पब्लिक प्रोफाईल तयार करण्यासाठी गुगल कडून तुम्हाला एक फॉर्म देण्यात येईल. त्यात तुम्हाला विचारलेली माहिती भरायची आहे. उदा. लोकेशन, व्यवसाय, शिक्षण, वेबसाईट, सोशल मीडिया प्रोफाईल, इत्यादी.

Google People Cards (Photo Credits: Google)

 

हे सर्व झाल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा. काही तासांनंतर तुमचे People Card तयार होईल.

Google People Cards (Photo Credits: Google)

या नव्या फिचरमुळे पब्लिक प्रोफाईल तयार करणे सोपे होणार असून हे भारतीय युजर्सच्या नक्कीच पसंतीस पडेल.