एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन Realme C15 भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स
Realme C15 (Photo Credits-Twitter)

Realme कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया मध्ये त्यांचा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन Realme C15 लॉन्च केला होता. कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असून त्यामध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. इंडोनेशिया नंतर आता भारतीय युजर्ससुद्धा या स्मार्टफोनची प्रतिक्षा करत आहेत. याच दरम्यान आता युजर्ससाठी एक खुशखबर असून Realme C15 लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. परंतु भारतात कधी लॉन्च करणार याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु कंपनीच्या सपोर्ट पेजवर लिस्ट करण्यात आलेला आहे.(Thomson यांनी भारतात 10,999 रुपये किंमतीत लॉन्च केला Make In India' Android टीव्ही)

Realme India च्या सपोर्ट पेजवर नवा स्मार्टफोन लिस्ट मध्ये Realme C15 दिसून येत आहे. यामुळे असे स्पष्ट होते की, हा स्मार्टफोन भारतात जरुर लॉन्च करण्यासाठी तयार आहे. पण कंपनी या स्मार्टफोनबाबत अधिकृत घोषणा कधी करणार याची वाट पहावी लागणार आहे. या स्मार्टफोनच्या 3GB+64GB मॉडेलच किंमत IDR 1,9999,000 म्हणजेच 10,300 रुपये आहे. तर 4GB+64GB मॉडेलची किंमत IDR 2,1999,000 म्हणजे 11,300 रुपये आहे. 4GB+128GB मॉडेलसाठी IDR 2,4999,000 म्हणजे 12,900 रुपये मोजावे लागणार आहेत. असा अंदाज लावला जात आहे की, भारतात हा स्मार्टफोन 8,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो.(Flipkart Big Savings Day 2020 ला 6 ऑगस्ट पासून सुरुवात; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंट्स) 

Realme C15 मध्ये वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह 6,52 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला आहे. याची स्क्रिन रेज्योल्यूशन 1600X720 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G35 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये एक्सपेंडेबल स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. अॅन्ड्रॉइड 10 OS वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 6,0000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18w फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. तर 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो सेंसर आणि 2MP मोनो क्रोम सेंसर उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये युजर्सला 8MP फ्रंट कॅमेऱ्याची सुविधा मिळणार आहे.