
जर्मन कंपनी Thomson यांनी भारतीय बाजारात गेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा Oath Pro सीरीज मधील Android Smart TV लॉन्च केला होता. ज्यामध्ये कंपनीने 43इंच, 53 इंच आणि 65 इंच असणारे मॉडेल्स झळकवले होते. याची सुरुवाती किंमत 24,999 रुपये होती. यानंतर कंपनीने आता या सीरिजमध्ये आणखी दोन नव्या इंचाचे टीव्हीचा समावेश केला आहे. या सीरिज मधील कंपनीने 50 इंच आणि 75 इंचाची स्क्रिन असणारा टीव्ही लॉन्च केला आहे. 50 इंचाच्या टीव्ही स्क्रिनची किंमत 28,999 रुपये आहे. तर 75 इंचाचा टीव्ही 99,999 रुपये आहे. या सीरिज व्यतिरिक्त कंपनीने 9A आणि 9R मेक इन इंडिया लाइसेंस्ड अॅन्ड्रॉइड टीव्ही सुद्धा लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्ट टीव्ही बजेट रेंज मध्ये उपलब्ध करुन दिले आहेत.
Thomson TV 9A आणि 9R सीरिजचे मेक इन इंडिया मॉडेल्स येत्या 6 ऑगस्टला सेलसाठी उलब्ध करुन दिले जाणार आहेत. याची सुरुवाती किंमत 19,999 रुपये आहे. तर Oath Pro सीरिजचे अन्य दोन मॉडेल्स सुद्धा 6 ऑगस्टला ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. Thomson 9A सीरिजच्या HD PATH 32 इंचाच्या मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. या व्यतिरिक्त 40 इंच आणि 43 इंचाच्या मॉडेल्सची किंमत क्रमश: 16,999 रुपये आणि 19,999 रुपये आहे. Thomson 9A बेजल लेस टीव्हीच्या 32 इंचाच्या मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे. Thomson 9R सीरिच्या 4K PATH सीरिजच्या 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तर 50 इंच आणि 55 इंचाच्या मॉडेल्सची किंमत क्रमश: 25,999 रुपये आणि 29,999 रुपये आहे.(Flipkart Big Saving Days 2020: 6 ऑगस्टपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज'ला सुरूवात; मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट)
Thomson चे नवे लॉन्च झालेले अल्ट्रा बजेट रेंज स्मार्ट टीव्ही वोकल फॉर लोकल मोहिमेअंतर्गत भारतात तयार करण्यात आले आहेत. या स्मार्ट टीव्हीचा उपयोग खासकरुन वर्क फॉर्म होम आणि ऑनलाईन क्लासेससाठी होणार आहे. यामध्ये युजर्सला गुगल असिस्टंटच्या माध्यमातून कोरोना व्हायरस संदर्भातील लेटेस्ट अपडेट्स, फूड डिलिव्हरी, ऑनलाईन लर्निंग, म्युझिक सिस्टिं सपोर्ट सुद्धा देण्यात येणार आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये Wifi, HDMI आणि USB पोर्ट्स सुविधा मिळणार आहे. त्याचसोबत युजर्सला त्यांच्या आवडीचे अॅप सुद्धा इन्स्टॉल करता येणार आहेत.
कंपनीने गेल्या महिन्यात लॉन्च केलेले Oath Pro सीरिजचे नवे मॉडेल्स सुद्धा बेजल लेस डिझाइन आणि 4K HDR क्वालिटी डिस्प्लेसह लॉन्च केले आहेत. यामध्ये युजर्सला गुगल वॉइस असिस्टंट, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, युट्युब सारखे ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप्ससाठी डेडिकेटेड बटन्स रिमोट्सवर देण्यात आले आहेत. यामध्ये काही प्री-इन्स्टॉल अॅप्स सुद्धा दिले आहेत. त्याचसोबत या टीव्हीसाठी उत्तम साउंट क्वालिटी सुद्धा दिली आहे.