Flipkart Big Saving Days 2020: 6 ऑगस्टपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज'ला सुरूवात; मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट
Flipkart Big Saving Days (Photo Credits: Faceook)

Flipkart Big Saving Days 2020: फ्लिपकार्टकडून (Flipkart) येत्या 6 ऑगस्टपासून मोठ्या सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्, फॅशन आणि अन्य वस्तूवर मोठी सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज (Flipkart Big Saving Days) मध्ये खरेदी करण्यासाठी 10 ऑगस्ट हा शेवटचा दिवस असणार आहे.

फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला 5 ऑगस्टला सायंकाळी 8 वाजल्यापासून अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये ग्राहकांना सिटी बँक क्रेडिट, डेबिट कार्ड्स आणि आयसीआयसीआय कार्ड्स वरून शॉपिंग केल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. (हेही वाचा -  भारतात लाँच झाले वायरलेस ईअरबड्स ITW-60; याची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का)

दरम्यान, या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूवर मोठी सूट मिळणार आहे. या बिग सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सच्या किंमतीवर 50 टक्के सूट मिळणार असून नो कॉस्ट ईएमआय ऑफरदेखील देण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्टफोनवर 30 ते 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असून ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ घेता येणार आहे.

याशिवाय तुम्ही लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावरदेखील 35 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच फॅशन कॅटेगरीत टॉप ब्रँड्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला अगदी कमी किंमतीत चांगल्या क्वालिटीचा मोबाईल फोन मिळू शकतो. या सेलमध्ये रेडमी नोट 7 प्रो, ऑनर 10 लाइट, सॅमसंग गॅलेक्सी सीरीज, अॅपल आयफोन्स, आसुस मॅक्स प्रो, शाओमी रेडमी 7 सीरीज स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स मिळणार आहेत.