रोज येणा-या नवनवीन गॅजेट्स मुळे संपूर्ण जग पूर्णपणे बदलून गेले आहे. मोबाईल्सपासून स्मार्ट बँड्सपर्यंत जबरदस्त गॅजेट्स भारतात येत आहे. तसेच ईअरफोन्स आणि ईअरबड्सला(Earbuds) देखील प्रचंड डिमांड आहे. म्हणूनच itel कंपनीने आपले वायरलेस ईअरबड्स ITW-60 भारतात लाँच केले आहे. 1699 रुपयांच्या किंमतीत येणारे हे ईअरबड्स गाणी ऐकण्याचा तसेच आवाजाचा जबरदस्त अनुभव देतात. याची वैशिष्ट्ये पाहून ईअरबड्सची आवड असलेल्या गॅजेटप्रेमी नक्कीच हा खरेदी करण्याचा विचार करतील.
ITW-60 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 13mm साउंड ड्रायवर देण्यात आला आहे. itel कंपनीचे असा दावा केला आहे की, संगीतप्रेमींचा विचार करुन हा खास डिझाईन करण्यात आला आहे. यात क्रिस्टल क्लीअर ट्रिबल प्रोड्यूस होते. या दोन्ही ईअरबड्सला टच कंट्रोल देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स कॉल उचलण्यासोबत म्यूजिक नियंत्रित करु शकता.
हेदेखील वाचा- भारतात लाँच झाले वायरलेस ईअरबड्स ITW-60;याची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, प्रत्येक बड्समध्ये 35mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जो 2.5 तासांचा म्यूजिक प्लेटाईम आणि 3 तासांचा टॉकटाईम देतो. त्याचबरोबर ITW-60 चार्जिंग केसमध्ये 500mAh ची बॅटरी मिळते जी 35 तासांचा स्टँडबाय टाईम आणि ईअरबड्स 6 वेळा चार्ज करण्याची क्षमता देतो.
itel कंपनीने ITW-60 ईअरबड्सने चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट दिले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth V5.0 दिला गेला आहे, जो पॉप-अप पेअरिंग मोडसह स्टेबल कनेक्टिव्हिटीसह दिला आहे. त्याचबरोबर या सोबत 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे.