हुआवे (Huawei) कंपनीचे एकाहून एक सरस गॅजेट्स लाँच होतच असतात. पण त्यात आता आणखी एक नव्या गॅजेटची भर पडली आहे. हुआवे ने आपला नवा Huawei Freebuds 3i ईअरबड्स भारतात लाँच केला आहे. या ईअरबड्सची वैशिष्ट्ये खूपच आकर्षक आणि जबरदस्त आहेत. मह्त्वाची गोष्ट म्हणजे या ईअरबड्ससह तुम्हाला Huawei Band 4 मोफत दिला जात आहे. ज्याची किंमत 3,099 रुपये आहे. हे ईयरबड्स अॅमेजॉन प्राईमच्या (Amazon Prime) सदस्यांसाठी 6 ते 7 ऑगस्ट दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर अन्य लोकांसाठी 12 ऑगस्टला विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
हुआवे फ्रीबड्स थ्री आय च्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, कंपनीने 10mm चे डायनॅमिक ड्रायवर, तीन मायक्रोफोन आणि टच सपोर्ट कंट्रोल्स दिले आहेत. त्यासोबतच अॅक्टिव नॉइस कॅन्सलेशन फिचर सुद्धा दिले आहेत. याच्या टीप मध्ये सिलिकॉन टीप दिली गेली आहे जी 4 वेगवेगळ्या आकारात येते.
याचे ईअरबड्सचे वजन 5.5 ग्रॅम इतके आहे. यात 37mAh ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यामुळे आपण 3.5 तास म्यूजिक प्लेबॅक साठी बॅकअपल मिळतो. त्यासोबत याच्या केसमध्ये 410mAh ची बॅटरी दिली गेली आहे ज्यात 14.5 तासांचा प्लेबॅक दिला गेला आहे.
Huawei Freebuds 3i ईअरबड्समध्ये Bluetooth 5.0 कनेक्टिव्हिटीसह लाँच केला आहे. त्यासोबतच यात USB-C पोर्टसुद्धा दिला गेला आहे.