फ्लिपकार्टवर Flipkat Big Saving Days 2020 ला 6 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना मोबाईल्स (Mobiles), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), फॅशन प्रॉडक्ट्स (Fashion Products) यावर भरगोस सूट मिळत आहे. 6-10 ऑगस्ट दरम्यान या सेलचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्संसाठी हा सेल 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजताच सुरु केला जाईल. या सेलअंतर्गत सिटी बँक (Citi Bank) क्रेडिट व डेबिट कार्ड्स, आयसीआयसीआय (ICICI) कार्ड्स यावरुन खरेदी केल्यास 10% चा डिस्काऊंट मिळेल. या सेलमध्ये प्रत्येक 6 तासानंतर ब्लॉक बस्टर डिल्स मिळतील. त्यात मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप इत्यादींवर शानदार ऑफर्स दिल्या जातील. विशेष म्हणजे 2-4 ऑगस्ट दरम्यान आपल्या आवडीचे प्रॉडक्ट्स केवळ 30 रुपयांत प्री-बुक करता येतील. तसंच हे सर्व प्रॉडक्ट्स सेल अंतर्गत अगदी स्वस्तात मिळतील अशी माहिती फ्लिपकार्टकडून देण्यात आली आहे.
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॅटगरीमध्ये प्रॉडक्ट्स 50% ची सूट दिली जात आहे. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआयची ऑफर मिळत आहे. मोबाईल फोन्सवर 30-40% ची सूट आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. टीव्ही आणि होम अप्लायन्सेस वर 50% ची सवलत दिली जात आहे. लॅपटॉपवर 35-50% सूट मिळण्याची संधी या सेलमध्ये युजर्संना मिळत आहे. तसंच फॅशनच्या टॉप ब्रँड्सवर 80% ची सूट मिळत आहे.
फ्लिपकार्टच्या या सेल अंतर्गत बेस्ट सेलर स्मार्टफोन्स सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत. रेडमी नोट 7 प्रो, ऑनर 10 लाईट, सॅमसंग गॅलेक्सी सिरीज, अॅपल आयफोन्स, असुस मॅक्स प्रो आणि शाओमी रेडमी 7 सिरीजवर बंपर ऑफर्स मिळत आहेत. तसंच फोन्सवर एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय आणि बायबँक गॅरंटी देखील मिळेल.
या सेल अंतर्गत रियलमी एक्स 2 प्रो च्या 8 जीबी रॅम आणि 28 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये, ऑनर 9एस ची किंमत 5,999 रुपये, iQOO3 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,990 रुपये, ओप्पो रेनो 2एफ च्या 6 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. ओप्पो एफ11 प्रो च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,990 रुपये इतकी आहे.