जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क (Elon Musk Tweet) यांनी ट्विट करत थेट जाहीर माफी मागितली आहे. काल विविध देशांमध्ये ट्विटर (Twitter) अत्यंत स्लो चालत होत. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Microblogging Site Twitter) वापरणाऱ्यांकडून विविध तक्रारी येत होत्या. तरी ट्विटर “सुपर स्लो” (Super Slow) असल्याबाबत दिलगीरी व्यक्त करत ट्विटर वापरकर्त्यांची (Twitter User) एलॉन मस्क यांनी जाहिर माफी मागितली आहे.एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट केलं आहे की, अनेक देशांमध्ये ट्विटर (Twitter) अतिशय स्लो (Slow) असल्याबद्दल मी माफी मागू इच्छितो. अॅप (App) केवळ होम टाइमलाइन रेंडर (Home Timeline Render) करण्यासाठी > 1000 खराब बॅच केलेले RPC करत असल्याने ट्विटर (Twitter) वापरण्यात अडचणी किंवा ट्विटर स्लो (Twitter Slow) चालत असल्याची माहिती ऐलॉन मस्क (Elon Musk) यांनी या ट्विट मधून दिली आहे.
यापूर्वी ट्विटरवर ब्लू टिक (Twitter Blue Tick) केवळ प्रसिद्ध व्यक्ती (Famous Person), राजकारणी (Politician), पत्रकार (Journalist) आणि सार्वजनिक व्यक्तींच्या (Public Figure) सत्यापित खात्यांनाचं मिळायची. पण ट्विटरच्या नव्या सबस्क्रिप्शन प्रोग्रामनुसार (Subscription Program) दरमहा $8 देणाऱ्या प्रत्येक ट्विटर वापरकर्त्यांला (Twitter User) ट्विटरवर व्हेरिफाइड (Varified) होण्याचा शिक्का मिळणार आहे. ट्विटर बाबत होणारे हे नवे बदल पचायला जड असले तरी नव्या मालकाकडून घेण्यात आलेले हे महत्वपूर्ण निर्णय आहेत. (हे ही वाचा:- Doodle for Google Competition 2022: कोलकाता येथील श्लोक मुखर्जी ठरला यंदाचा गूगल डूडल स्पर्धेचा विजेता)
ट्विटर (Twitter), ट्विटर अपडेट (Twitter Update), ट्विटर निर्णय हे शब्द हल्ली रोज कानावर पडतात. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क रोज काय नवा निर्णय घेतील ह्याचा काही नेम नाही. यापूर्वी ट्वीटर ही मायक्रोब्लॉंगिंग साईट संपूर्ण जगभरात निशुल्क वापरता येत होती पण ट्वीटरचे नवे मालक एलॉन मस्क यासंबंधित नुकतीचं एक मोठी घोषणा केली होती