(PC - Google Doodle)

गुगरलद्वारे (Google ) घेण्यात आलेल्या डूडल स्पर्धेचा (Google Doodle Competition 2022) निकाल सोमवारी (14 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आला. या निकालानुसार 'इंडिया ऑन द सेंटर स्टेज' ('India on the center stage) या संकल्पनेतून साकारलेल्या डूडला पहिले मानांकन मिळाले. हे मानांकन कोलकाता येथील श्लोक मुखर्जी याला मिळाले. श्लोकचे डूडल 14 नोव्हेंबर (सोमवार) रोजी Google.co.in वर देखील प्रदर्शित केले जात आहे.

डूडल शेअर करताना श्लोकने म्हटले आहे की, माझ्या भारतामध्ये पुढची 25 वर्षांमध्ये शास्त्रज्ञ मानवतेच्या भल्यासाठी स्वत:चे इको-फ्रेंडली रोबोट विकसित करतील. भारत पृथ्वीपासून अंतराळापर्यंत नियमित (अंतराळ) प्रवास करेल. भारत योग आणि आयुर्वेदात अधिक विकास करेल, आणि येत्या काही वर्षात आणखी मजबूत होईल.

दरम्यान, गूगल डुडल सपर्धेसाठी यंदाच्या वर्षी भारतातील 100 हून अधिक शहरांमधून इयत्ता 1 ते 10 मधील मुलांकडून 115,000 प्रवेशिका दाखल झाल्या. त्यात "पुढील 25 वर्षांत, माझा भारत असेल..." या थीमला अनेकांनी प्रतिसाद दिला. स्पर्धकांकडून आलेल्या संकलप्नांनीच निवड करण्याासठी निर्णायक पॅनेलमध्ये अभिनेता, चित्रपट निर्माता, निर्माता आणि टीव्ही व्यक्तिमत्व नीना गुप्ता, टिंकल कॉमिक्सच्या मुख्य संपादक, कुरियाकोसे वैसियन, YouTube क्रिएटर्स स्लेयपॉइंट आणि कलाकार आणि उद्योजक अलिका भट, के Google डूडल टीमसह समाविष्ट होता.

ट्विट

"विद्यार्थ्यांनी त्यांच्या एंट्रीमध्ये आणलेली सर्जनशीलता आणि कल्पकता पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विशेषत: अनेक डूडलमध्ये तंत्रज्ञान आणि टिकाऊपणाची प्रगती सामान्य थीम म्हणून उदयास आल्याने आम्हाला आनंद झाला," असे Google Doodle पेजने म्हटले आहे.