CoWin च्या नावाने बनावट App सह लिंक व्हायरल, सावध व्हा नाहीतर बँक खाते होईल रिकामे
Coronavirus (Photo Credits: ANI)

देशात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात पार पाडली जात आहे. मात्र याचा फायदा घेऊन नागरिकांची फसवणूक केली जात आहे. आपल्याला माहितीच आहे की, लस घेण्यासाठी प्रथम कोविन अॅपवर (CoWin App) रजिस्ट्रेशन करण्यासह शेड्युल करत त्यासाठी वेळ निवडावी लागते. कोविनच्या वेबसाइटवर लसीकरणासंबंधित सर्व माहिती दिली असते. अशातच आता हॅकर्सकडून या वेबसाइटला निशाणा बनवत लोकांची लूटमार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या वेबसाइट सारखीच दिसणारी बनवाइट साइट आणि अॅप हॅकर्सकडून तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे चुकूनसुद्धा तुम्ही याच्या जाळ्यात अडकल्यास तुमच्या खात्यामधील रक्कम खाली होण्याचा धोका आहे.

स्लॉट मिळणार लागणारा उशिर याचा फायदा घेत हॅकर्सकजून एक मेसेज पाठवला जात आहे. त्यामध्ये स्लॉट बुकिंग करण्याबद्दल सांगितले आहे. SMS सह एक लिंक सुद्धा दिली जाते. ही लिंक म्हणजे अॅन्ड्रॉइड मालवेअर असते. त्यामुळे जसे एखाद्या व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केल्यास तो मालवेअर (व्हायरस) फोनमध्ये इंस्टॉल होतो. हा व्हायरस फोनमध्ये सेव्ह करण्यात आलेले कॉन्टॅक्स, एसएमएससह अन्य माहिती सुद्धा काढून घेतो. सायबर सिक्युरिटी फर्म ESET Lukas Stefank यांच्याकडून करण्यात आलेल्या रिसर्जमध्ये असे समोर आले की, हा व्हायरल एप्रिल मध्ये आला असून तो अद्याप ही अॅक्टिव्ह आहे.(Paytm Cashback च्या नावाखाली नागरिकांची केली जातेय फसवणूक, 'या' पद्धतीने करा बचाव)

CERT-In यांनी म्हटले की, एसएमएसच्या माध्यमातून जो फेक मेसेज व्हायरल केला जात आहे त्यामध्येच लसीकरण करण्यात येणार असल्याचा चुकीचा दावा केला जातोय. या संबंधित मोबाइल फोन युजर्सला अलर्ट रहावे लागणार आहे. या एसएमएस मधील एक लिंक वर क्लिक करण्यास सांगितले जाते. त्यांनी पुढे असे म्हटले की, अॅप फोनमधील मेसेजच्या माध्यमातून स्वत:हून एक दुसरे कॉन्टॅक्ट पर्यंत पोहचतो. यामुळे खासगी माहिती ते आर्थिक व्यवहारांवर निशाणा साधला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सला सावध राहणे खुप महत्वाचे आहे.