COVID19 च्या परिस्थितीमुळे डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर केला जात आहे. लोकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीच खासकरुन सांगितले जात आहे. याच कारणास्तव सायबर गुन्हेगार अधिक अॅक्टिव्ह झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, पेटीएम कॅशबॅकच्या (Paytm Cashback) नावाखाली लोकांना सायबर फ्रॉडमध्ये फसवले जात आहे. सध्या नागरिकांची फसवणूक करण्यासाठी Chrome नोटिफिकेशनच्या माध्यमाचा वापर केला जात आहे. या नोटिफिकेशनमध्ये युजर्सला असे सांगितले जात आहे की, शुभेच्छा! तुम्ही Paytm Scratch Card जिंकले आहे.
लोक आपल्याला स्क्रॅच कार्डमध्ये काहीतरी मिळेल या आशेने ते उघडून पाहतात. ते उघडून पाहिल्यानंतर Paytm-cashoffer.com वेबसाइटचे एक पेज तुम्हाला सुरु झाल्याचे दाखवले जाईल. यामध्ये असे म्हटले जाते की, तुम्ही 2647 रुपयांचा कॅशबॅक जिंकला आहात. त्यानंतर रिवॉर्ड तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यासाठी सांगितले जाते. या वेबपेजचे डिझाइन अॅपसारखेच आहे. यामध्येच पेमेंट करण्यास सांगितले जाते. युजर्स लक्ष देत नाहीत की आणि त्यावर क्लिक करतात. यामध्ये युजर्सच्या अकाउंट मधून स्कॅमर्सच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत.(Twitter ला डिजिटल मीडिया संबंधित नवे IT नियमांचे पालन करावे लागणार- दिल्ली हायकोर्ट)
तर नागरिकांची केली जाणारी ही फसवणूक UPI वर आधारित आहे. म्हणजेच तुम्हाला UPI आधारित अॅपच्या माध्यमातून ट्रान्सफर करावे लागणार आहे. लक्षात असू द्या की, कॅशबॅक ऑफर फक्त पेटीएम अॅपमध्ये दिसून येतात. कंपनी कॅशबॅक डायरेक्टली वॉलेट किंवा बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात. तुम्हाला कधीच कॅशबॅक कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला कधीच दुसऱ्या साइटवर जाण्यास सांगितले जात नाही.
अशा पद्धतीच्या फसवणूकी पासून बचाव करण्यासाठी ऑनलाईन मध्ये येणाऱ्या नोटिफिकेशनकडे लक्ष द्या. UPI आधारित पेमेंट सिस्टिम मधून पैसे रिसिव्ह किंवा पे करताना लक्ष द्या. स्कॅमर्स याचाच फायदा घेत लोकांना पैसे पाठवण्याच्या नावाखाली पेमेंट रिक्वेस्ट पाठवतात. त्यामुळे जर तुम्ही त्यावर क्लिक केल्यास तुमच्याकडे UPI कोड मागितला जातो. तो तुम्ही दिल्यानंतर पैसे तुमच्या खात्यातील रक्कम स्कॅमर्सला ट्रान्सफर होतील.अशा पद्धतीच्या खोट्या मेसेजपासून सावध रहा आणि त्यावर क्लिक करु नका. जर तुम्हाला असा मेसेज आल्यास तर तुम्ही UPI आधारित Help & Support मध्ये जाऊन रिपोर्ट करु शकता.