कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक हे घराबाहेर न पडता फोनच्या किंवा घरातील लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून विविध आर्थिक कामं करण्यास प्राधान्य देत आहेत. अशा काळात तुमाला जर फेसबुक, व्हाट्सअॅप, ई-मेल किंवा इतर माध्यमातून फ्री सब्सक्रिप्शन एसएमएस (Subscription SMS येत असतील तर वेळीच सावधान व्हा. काही समाजकंटक आणी सायबर गुन्हेगार नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊ पाहात आहेत. कोणत्याही एसएमएस अथवा संदेशाला फॉलो करण्या आधी काही गोष्टी जरुर ध्यानात ठेवा.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार देशभरातील अनेक नागरिकांना नुकतेच नेटफ्लिक्सच्या माध्यमातून फ्री सब्सक्रिप्शन बाबात एसएमएस पाठविण्यात आले. यात नेटफ्लिक्सचा काहीही हात नव्हता. मात्र, हे मेसेज मात्र युजर्सपर्यंत पोहोचत होते. या मेसेजमध्ये एक लिंकही अॅटेच केलेली होती. या लिंकवर क्लिक करताच युजर्सला एक फॉर्म भरुन देण्यास सांगितले जात होते. ज्यात युजर्सची व्यक्गिगत आणि बँक खात्यांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. ज्या नागरिकांनी ही माहिती भरुन दिली त्या नागरिकांनाच्या बँक खात्यूतन पैसे काढण्यात आल्याचे काही काळांनी पुढे आले. या फ्रॉडबाबात कालांतराने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती कळली.
असे एसएमएस आल्यावर काय करावे?
- पहिल्यांदा मोह टाळा. ऑफर, सवलत, मोफत या शब्दांपासून स्वत:ला दूर ठेवा.
- ऑफर नेमकी कोणत्या कंपनीकडून देण्यात आली आहे याचा शोध घ्या. त्या कंपनीच्या अधिकृत
- फोन क्रमांक, ईमेल अथवा कस्टमर केअर विभागाशी संपर्क करा आणि ऑफरची खात्री करा.
- ध्यानत घ्या की, फकवणुकीच्या संदेशात नेहमी काही ना काही आमिश दाखवलेले असते. यात पैसे, भेट अथवा लॉटरी, वस्तू आदींचा समावेश असतो.
- अनोळखी ईमेल, वेबसाईट आणि युजर्स यांवर विश्वास ठेऊ नका.
- थोडे कष्ट घ्या पण, माहिती सत्यता तपासा.
- कोणत्याही वेबसाईटला यूआरएलच्या सुरुवातीला लॉकची निशाणी असते. ती तपासा. ती निशाणी ही वेबसाईट खरी असल्याचा एक पुरावा मानतात. असे असले तरीसुद्धा त्या वेबसाईटच्या सत्यतेची पुष्टी करुन घ्या.
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपले पासवर्ड, एटीएम पीन, एटीएम पीनच्या पाठीमागचे नंबर्स शेअर करु नका.
केवळ नेटफ्लिक्सच नव्हे तर WHO, UN आणि इंडियन काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आदींच्या माध्यमातूनही सायबर गुन्हेगारांनी लोकांना खोटे एसएमएस पाठवले. ज्याचे अनेक लोक शिकार झाले. त्यामुळे लॉकडाऊन काळात नागरिकांनी अधिक सावध असणे गरजेचे आहे. कारण, या काळात ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाइन सेवांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. त्यामुळे सावध राहा!