Reliance Jio (Photo Credits: Twitter/ Reliance Jio)

Indian Premier Leagueच्या तोंडावर रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी आणि नवीन ग्राहकांसाठी नवी ऑफर जारी केली आहे. ज्यामध्ये रिलायन्स जिओ मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन आणि हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात लाखो प्रेक्षक येतात. भारतात क्रिकेटचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे कंपनीने 299 चा प्लॅन जारी केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांचे मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच नवे Reliance Jio सीम घेणाऱ्या ग्राहकांना ही 90 दिवसांचे मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन मिळेल. ही ऑफर 17 ते 31 मार्च 2025 दरम्यान वैध आहे.

रिलायन्स जिओने जारी केलेल्या निवेदनात या ऑफर विषयी स्पष्ट माहिती दिली 

ऑफर निवडणाऱ्या ग्राहकांना 90 दिवसांचे मोफत जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल, ज्यामुळे त्यांना आयपीएल हंगामातील प्रत्येक सामना 4K रिझोल्यूशनमध्ये, होम टीव्ही किंवा मोबाइल डिव्हाइसवर पाहता येईल. याव्यतिरिक्त, कंपनी जिओ फायबर किंवा जिओ एअर फायबर ची 50 दिवस सुविधा देईल. ज्यामध्ये अल्ट्रा-फास्ट इंटरनेटसह 800 हून अधिक टेलिव्हिजन चॅनेल, 11 हून अधिक ओटीटी प्रयोग आणि अमर्यादित इंटरनेट यांचा समावेश आहे.

जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन २२ मार्च रोजी, आयपीएलच्या पहिल्या दिवशी सक्रिय केले जाईल आणि 90 दिवसांसाठी वैध राहील.