प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (Confederation of All India Traders) एका निवेदनात म्हटले आहे की, अॅमेझॉन (Amazon) ई-कॉमर्स पोर्टलवर गांजाची विक्री हा अॅमेझॉनचा नवीन आणि पहिला गुन्हा नाही. यापूर्वी 2019 मध्ये, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulwama Terror Attack) वापरण्यात आलेली सुधारित स्फोटक उपकरणे बनवण्यासाठीची रसायने देखील ई-कॉमर्स पोर्टलद्वारेच खरेदी करण्यात आली होती, ज्यामुळे 40 CRPF जवान शहीद झाले होते. पुलवामा प्रकरणाच्या तपासादरम्यान NIA ने मार्च 2020 मध्ये आपल्या अहवालात हे तथ्य उघड केले होते. मार्च 2020 मध्ये प्रसारमाध्यमांमध्येही ही बातमी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली होती.

इतर घटकांव्यतिरिक्त, अमोनियम नायट्रेट- जे भारतात प्रतिबंधित आहे, ते देखील पोर्टलवरून घेण्यात आले होते. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या अहवालांनुसार, एनआयएच्या प्राथमिक चौकशीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने खुलासा केला की त्याने आयईडी, बॅटरी आणि इतर वस्तू बनवण्यासाठी रसायने खरेदी करण्यासाठी त्याच्या अॅमेझॉन ऑनलाइन शॉपिंग खात्याचा वापर केला होता.

सीएआयटीने म्हटले आहे की बंदी घातलेल्या गोष्टींची विक्री सुलभ करून देऊन त्याचा वापर आमच्या सैनिकांविरुद्ध केला गेला, त्यामुळे अॅमेझॉन आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सीएआयटीच्या निवेदनात म्हटले आहे की, धोरण तयार करणारे आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जी वृत्तीचा हा परिणाम आहे, जे ई-कॉमर्स पोर्टल्सना स्वतःची मनमानी करू देत आहेत. महत्वाचे म्हणेज बंदी असलेल्या वस्तूंच्या विक्रीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही हे एक मोठे आश्चर्य आहे.

(हेही वाचा: Twitter कडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या ट्विटची ओळख पटवण्यासाठी उचलले 'हे' पाऊल)

बीसी भारतीय आणि प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, अमोनियम नायट्रेटला 2011 मध्ये प्रतिबंधित वस्तू घोषित करण्यात आले होते. यासाठी स्फोटक कायदा, 1884 अंतर्गत अमोनियम नायट्रेटची भारतात खुली विक्री, खरेदी आणि उत्पादनावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. व्यस्त आणि गजबजलेल्या भागात स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट हे मुख्य स्फोटक होते. मुंबईपूर्वी 2006 मध्ये वाराणसी आणि मालेगावमध्ये आणि 2008 मध्ये दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता.