स्मार्टफोनला आग लागण्याच्या दुर्घटनेपासून दूर राहण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या खबरदारी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

सध्या बाजारात नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता. काही दिवसांपूर्वी शाओमी कंपनीच्या रेडमी 7S स्मार्टफोनला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा शाओमी कंपनीच्याच स्मार्टफोन जळून खाक झाला होता. गिचजाइना यांच्या रिपोर्टनुसार ही घटना चीन येथील आहे. एका मुलाने आपल्या वडिलांसाठी स्मार्टफोन खरेदी केला होता मात्र त्याला अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. यामध्ये व्यक्तीला कोणतेही नुकसान झाले नाही. यावर कंपनीकडून अन्य काही कारणांमुळे स्मार्टफोन जळाला असल्याचे उत्तर दिले आहे.

स्मार्टफोनला आग लागण्याचा प्रकार सर्वसामान्य होत चालला आहे. मात्र ही दुर्घटना होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे हे तितकेच महत्वाचे आहे. तर जाणून घ्या स्मार्टफोनला आग लागण्याच्या दुर्घटनेपासून दूर राहण्यासाठी कशा पद्धतीने खबरदारी घ्याल.

-रात्रभर फोन चार्जिंग करणे टाळा

तुमच्या फोनची बॅटरी रात्रीच्या वेळेस खुप कमी झाल्यास तो संपूर्ण रात्रभर चार्जिंगला लावणे टाळा. यामुळे तुमच्या स्मार्टफोनला किंवा बॅटरीला नुकसान पोहचू शकते.

-ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवा

ज्वलनशील म्हणजेच ज्या गोष्टींपासून आग निर्माण होईल अशा वस्तूंपासून स्मार्टफोन दूर ठेवा. म्हणजेच जर तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगवेळी बेड वर ठेवल्यास त्यामधून निघणारी हिट तेथच जमा होते. त्यामुळे फोन वेगाने गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते.

-लोकल मार्केटमधून खरेदी केलेल्या बॅटरीपासून सावधान

काहीजण पैसे वाचवण्यासाठी लोकल मार्केटमधून बॅटरी खरेदी करण्याची चूक करतात. फोनची बॅटरी खरेदी करताना नेहमी ऑरिजनल घ्यावी. स्वस्त आणि लोकल बॅटरीमुळे स्मार्टफोनमध्ये बिघाड होतोच पण आग लागण्याचे हे एक कारण ठरु शकते.

-ऑथोराईज्ड सर्विस सेंटरमध्ये दुरुस्त करा स्मार्टफोन

फोनमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास लोकल शॉप मधून रिपेरिंग करु नका. त्यापेक्षा कंपनीच्या सर्विस सेंटरमध्ये दाखवून दुरुस्ती करणे योग्य पर्याय आहे.

-एक्सटेंशन बोर्ड लावून फोन कधीच चार्ज करु नका

फोन नेहमीच डायरेक्ट पॉवर सॉकेटमध्ये लावून चार्ज करण्याचा प्रयत्न करा. परंतु जर तुम्ही एक्सटेंशन बोर्ड लावून फोन चार्ज करत असल्यास आग लागू शकते. त्यामुळे जरा अशा गोष्टींपासून सावध रहा.(नव्या वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार)

एवढेच नाही काही जणांना झोपताना मोबाईल उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. ही चुकीची बाब असून उशीखाली मोबाईल ठेवल्याने त्याचे तापमान वाढून त्याचा परिणाम फोनवर होतो. यामुळे वरील काही गोष्टी लक्षात ठेवून फोनला आग लागण्यापासून तुम्ही स्वत: ला वाचवू शकता.